पाटोदा: शिव जागृती न्यूज
231 आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार माजी राज्यमंत्री सुरेश धस यांच्या विजयासाठी पाटोदा नगराध्यक्षा सौ दिपालीताई राजू (भैय्या)जाधव या पाटोदा शहरांमध्ये प्रचार करत असून येथील महिलांचा त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे . जसजशी निवडणूक जवळ येत आहे तशी प्रचाराची रणधुमाळी मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे चित्र आष्टी मतदारसंघात पहावयास मिळत आहे.
महायुतीचे उमेदवार माजी मंत्री सुरेश धस यांच्या प्रचारार्थ नगराध्यक्षा सौ दिपाली जाधव या सुरुवातीपासूनच प्रचारात उतरल्या आहेत. त्यांच्यासोबत प्रचारात मोठ्या प्रमाणावर महिलांनी सहभाग घेतला आहे. प्रत्यक्ष मतदारांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेत केलेल्या विकासात्मक कामाची माहिती देण्यात आली. पुढील काळात विकासात्मक कामे मोठ्या प्रमाणावर राबवण्याचे आश्वासन मतदारांना देत सुरेश धस यांना मतदान करण्याची विनंती केली. त्यांच्या या गाठीभेटीत ठिकठिकाणी नागरिकांचा, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सदरील निवडणूक आता जनतेनेच हातात घेतल्यामुळे सुरेश धस हे मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचे मतदारातुन बोलले जात आहे. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता
पाटोदा शहरात डोअर टू डोअर जाऊन प्रचार करीत "कमळ" या चिन्हा समोरील बटन दाबून सुरेश धस यांना मोठ्या मताने विजयी करावे असे आवाहन मतदारांना केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा