आमदार साहेब पुर्णवेळ काम करणारे अधिकारी द्या....
पाटोदा : शिव जागृती न्यूज
निजाम कालीन पाटोदा तालुका असला तरी विकासा पासून कोसोदूर लांब राहिला आहे यांचे कारण म्हणजे स्वर्गीय आमदार लक्ष्मणराव जाधव व अॕड.शाहुराव जाधव यांच्या निधनानंतर पाटोदा तालुक्यात एकही स्वयंभू नेतृत्व नसल्याने पाटोदा तालुक्यात काहीही करायचे असेल तर पहिले आष्टीवाल्याना विचारावा लागते यामुळे तालुक्यातील अनेक प्रश्न पडुन आहेत तर यामुळे तालुक्यातील पुढारी लक्ष देत नसल्याने अधिकारी व कर्मचारी कामचुकार पणा करत असतात तर कोणत्याही अॉफीस मध्ये संपूर्ण वेळ कर्मचारी काम करत नसल्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांचे कामे वेळेवर होत नाहीत .
पाटोदा तालुक्यातील तहसिलदार, मुख्यअधिकारी नगर पंचायत,सार्वजनिक बांधकाम विभाग,जि.प ग्रामीण पाणी पुरवठा, पंचायत समिती गटविकास अधिकारी, जि.प जलसंधारण उपविभाग,जि.प बांधकाम उपविभाग, बालविकास प्रकल्प अधिकारी व गटशिक्षण अधिकारी ,तालुका कृषी अधिकारी इत्यादी महत्त्वाच्या कार्यालयात प्रभारी अधिकारी काम पाहतात तालुक्यात प्रभारी राज्य असल्याने अधिकार्याच्या मनमानी कारभाराने पाटोदा तालुक्यातील सामान्य जनता बेजार झाली असून आमदार आजबे आनी आ धस साहेबांनी पाटोदा तालुक्यात पुर्ण वेळ काम करणारे अधिकारी देऊन पाटोदा तालुका वाचवावा अशी मागणी पाटोदा तालुक्यातील नागरिकाकडून होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा