आ सुरेश अण्णा धस मित्रमंडळ व डोंगरकीन्ही भाजपच्या वतीने ऊसतोड कामगार नोंदणी अभियान जनजागृतीस सुरुवात


युवानेते अशोक सुपेकर यांच्या वतीने ओळखपत्र फॉर्मचे मोफत वाटप


पाटोदा: शिव जागृती न्यूज

       ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या आ सुरेश धस यांच्या ऊसतोड कामगारांची शासन दरबारी नोंद व्हावी या मागणीला यश आलेले असून शासनाकडून ओळखपत्र देण्याबाबतचा शासन आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे. 

   या अनुषंगाने याबाबत सर्व ऊसतोड कामगारांना माहिती व्हावी, कामगारांनी योग्य माहितीसह सर्व फॉर्म व्यवस्थित भरून शासनाच्या प्रतिनिधीकडे जमा करावा यासाठी आ सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगरकीन्ही गटाचे भाजप युवा नेते अशोक सुपेकर यांनी मोफत फॉर्म वाटपासह जनजागृती अभियानाची सुरुवात केली आहे. 

  डोंगरकीन्ही गटातील नायगाव (मयूर) या गावातून मोफत फॉर्म वाटप व मार्गदर्शन, जनजागृती सुरू करण्यात आलेली आहे. यासाठी नोंदणी रथ तयार करण्यात आलेला असून आ सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली गावोगाव जाऊन याबाबत मार्गदर्शन, फॉर्म वाटप व याबाबत ऊसतोड कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे युवा नेते अशोक सुपेकर यांनी म्हंटले आहे. 

नायगाव (मयूर) येथे मोठ्या प्रमाणावर ऊसतोड कामगारांनी प्रतिसाद दिला. नायगाव येथे सरपंच सय्यद शाहीद यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी युवा नेते अशोक सुपेकर नायगाव चे सरपंच सय्यद शाहिद माजी सरपंच सालार पठाण ग्रामपंचायत सदस्य रामराजे सातपुते अशोक मोहलकर नूरखा राजेंद्र कवठेकर बाबू नामदार पठाण नवनाथ सातपुते राजेंद्र कवठेकर मुकादम महादेव कवठेकर मुकादम विठ्ठल कवठेकर मुकादम पवन राजे भोसले रामा बादल सिद्धार्थ वाघमारे हनुमान निकम योगेश सातपुते चक्रधर औटी लह कचरू मोहलकर निकम अंकुश निकम रमेश बादल कचरू लोहार पिंटू लोहार प्रदीप वाघुले सचीन सातपुते नामदेव कवठेकर बाबू निकम उमाजी सातपुते शिवराज सातपुते समीर पठाण दस्तगिर आतर गोकुळ कवठेकर बंडू वाघुले छगन मोरे बाळू मोहलकर माऊली वाघुले बापूराव कवठेकर बाबू कवठेकर बंडू कवठेकर इत्यादी मोठ्या संख्येने ऊसतोड कामगार उपस्थित होते

टिप्पण्या