नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला ॲम्बुलन्स घेऊन धनुभाऊ,बजरंग बप्पांनी शब्द पाळला - गोकुळ इंगोले ■ ॲम्बुलन्स मुळे पिठ्ठी गणातील नागरिकांना वेळेत उपचार मिळतील - श्रीराम तुपे
पिठ्ठी : शिव जागृती न्यूज नेटवर्क
पाटोदा तालुक्यातील नायगाव मयूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणार्या गावांना एका ऍम्ब्युलन्स ची आवश्यकता होती त्या बाबतीत येथील सामाजिक कार्यकर्ते गोकुळ इंगोले व श्रीराम तुपे यांनी वेळोवेळी हा विषय बजरंग बप्पा यांच्या कानावर घालत होते त्यांना नायगाव येथे भेट देण्यासाठी सुद्धा बोलवले होते.बजरंग बप्पा सोनवणे यांनी नायगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तुम्हाला या ठिकाणी लवकरच ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून देईन असा शब्द दिला होता त्याची आज पूर्तता केली आहे.
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.धनंजयजी मुंडे यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र नायगाव व परिसरातील रुग्णासाठी तातडीची सेवा उपलब्ध व्हावी यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राला एक ॲम्बुलन्स देण्यात आली यासाठी वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतेमंडळींच्या कानावर हा विषय घालून बजरंग बप्पा सोनवणे यांना या ठिकाणी येण्यास भाग पाडले होते व आरोग्य केंद्राला भेट देऊन बप्पांनी त्यावेळी शब्द दिला होता की तुम्हाला लवकरच ॲम्बुलन्स सुद्धा देऊ आणि तुमच्या परिसरातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध राहील.त्याची आज पूर्तता केल्याने नायगाव परिसरातील नागरिकांकडून त्यांचे आभार व्यक्त केले जात आहे त्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करणारे गोकुळ इंगोले व श्रीराम तुपे तसेच मित्रपरिवार यासाठी पाठपुरावा करत होते त्यांच्या पाठपुराव्याला आज यश आले आहे असेच म्हणावे लागेल.
-------------------------------------------
आरोग्य खूप महत्वाचे त्यासाठी प्रयत्न करत राहू! आरोग्य संदर्भात वेळ वेळी आवाज उठवत आलो आहोत. अधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत येणाऱ्या काळात देखील करत राहू नागरिकांच्या अडचणी सोडवत राहू.-गोकुळ इंगोले, सामाजिक कार्यकर्ते
राष्ट्रवादी पार्टी व पदाधिकाऱ्यांच्या मार्फत पिठ्ठी गणातील प्रश्न सोडू!
नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून व ॲम्बुलन्स चा मुद्दा आम्ही बजरंग बाप्पाच्या कानावर तसेच पदाधिकाऱ्यांच्या कानावर वेळोवेळी घालत आलो होतो त्यांना भेट देण्यासाठी सुद्धा बोलावलं होतं बाप्पाच्या ठिकाणी येऊन आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला लवकरच ॲम्बुलन्स मिळेल त्याचे आज पूर्तता केली त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व सर्वांचे मनःपूर्वक आभार...
- श्रीराम तुपे,
पिठ्ठी पंचायत समिती गण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.
-------------------------------------------------------------------------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा