राष्ट्रवादी युवक कॉग्रेस जिल्हा सरचिटणीस पदी राहुल बामदळे यांची निवड



पाटोदा *(गणेश शेवाळे)* देशाचे नेते शरद पवार यांच्या विचारधारेवर चालणारे कट्टर राष्ट्रवादी कॉग्रेस प्रेमी राहुल बामदळे हे शेतकरी कुटुंबातील असल्याने नेहमी सर्व सामान्यांच्या सुख-दुःखात पुढे असतात कधीही घमड न करता पक्ष वाढीसाठी सर्वांना आपले म्हणून काम करणारे यांची पक्षाने दखल घेऊन पाटोदा तालुक्यातील युवा नेतृत्व राहुल बामदळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस युवक पार्टीच्या जिल्हा सरचिटणीस पदी निवड करून सामान्य कुटुंबातील युवकांला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने न्याय दिला यामुळे येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत याचा पक्षाला खूप मोठा फायदा होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा सरचिटणीस पदी राहुल बामदळे यांची निवड झाल्याने पाटोदा तालुक्यात जल्लोष होत असून बामदळे यांच्यावर शुभेच्छा वर्षाव होत आहे

टिप्पण्या