कृषी विभागामार्फत जिल्हा अंतर्गत दोन दिवसीय शेत मजूर व शेतकरी यांच्यासाठी कौशल्य आधारित प्रशिक्षण संपन्न
दासखेड येथे दोन दिवसापासून कृषी विभाग, तालुका कृषी कार्यालय व आत्मा बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आत्माचे जिल्हा प्रकल्प संचालक, व तालुका कृषी अधिकारी ए.बी. गांगर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्याधारित काम करणाऱ्या शेतकरी व शेत मजूर यांच्याकरिता कीटकनाशक सुरक्षित फवारणी व हाताळणी व वापर कसा करावा याचे दोन दिवसीय प्रशिक्षण दासखेड येथे आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. मधुकर कोकाटे हे उपस्थित होते प्रसंगी जिल्हा शेतकरी सल्लागार समितीचे सदस्य हरिदास शेलार उपस्थित होते.
दोन दिवसीय चालणाऱ्या प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्र खामगाव ता. गेवराई चे बीबी गायकवाड व आर्या सीड्सचे जिल्हा प्रतिनिधी अमोल कोकाटे. पं. स पाटोदाचे कृ.अधि जे.एम. भुतपल्ले, मंडळ कृषी अधिकारी व्ही. यू. सोनवणे, बी.बी तांबे कृषी पर्यवेक्षक, कृ.स श्रीमती. आर.आर .जाधव उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना तालुका कृषी अधिकारी ए.बी गांगर्डे यांनी शेतकरी वर्गाने किडींचा अभ्यास व फवारणीची वेळ व फवारणी करताना सुरक्षा किट वापरून फवारणी करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. तसेच श्री. डॉ. गायकवाड यांनी प्रमुख किडींची ओळख व त्यावरील नियंत्रण कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले तसेच शेतकऱ्यांनी सुयोग्य मात्रेमध्ये कीटकनाशकांचा वापर कसा करावा याविषयी आपले मत मांडले.
कृ.स श्रीमती आर आर जाधव यांनी कपाशीमध्ये कामगंध सापळ्यांचा वापर किती फायदेशीर आहे याविषयी सखोल मार्गदर्शन केले तसेच या प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष फवारणी प्रात्यक्षिक करून दाखवले.
कार्यक्रमाच्या शेवटी शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच सर्व शेतकऱ्यांना ट्रॉपिकल ऍग्रो मार्फत सुरक्षाकिट चे वाटप करण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. कृष्णा आगलावे कृ. सहा, श्री.एस.एन ढवळे ,श्री. ए.ए जिंतपुरे यांनी प्रयत्न केले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा