आरोग्य विभागाच्या परीक्षा अखेर रद्द


 

मुंबई: शिवजागृती न्यूज नेटवर्क


 सप्टेंबर 25 आणि सप्टेंबर 26 रोजी होणाऱ्या परीक्षा अखेर रद्द करण्यात आल्याची घोषणा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर लागलेल्या बोलीच्या चर्चा आणि ज्या कंपनीकडे या परीक्षेचे कंत्राट देण्यात आले होते त्या कंपनीतील अवमेळ आदि कारणे याला कारणीभूत ठरली आहेत.

आरोग्य विभागात विविध पदासाठी भरती प्रक्रिया सुरू असून त्यासाठी उद्या दि.२५ आणि परवा दि.२६ रोजी परीक्षा होणार होत्या, मात्र परीक्षेपूर्वीच अनेक गोंधळ समोर आले होते, शुक्रवार पर्यंत अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र उपलब्ध होत नव्हते तर अनेक जिल्ह्यात या पदासाठी दहा ते पंधरा लाखांची बोली लावली गेल्याची चर्चा होती.त्यातच वेगवेगळ्या जिल्ह्यात परीक्षांचे वेळापत्रक वेगवेगळे ठेवण्यात आल्याचेही समोर आले होते, ज्या कंपनीकडे परीक्षा घेण्याचे कंत्राट देण्यात आले,त्या कंपनीने प्रश्नपत्रिका वितरित करण्यासाठी आणखी एका कंपनीला पोट कंत्राट दिल्याचा प्रकारही समोर आला होता, या साऱ्या प्रकारामुळे या परीक्षांच्या पारदर्शकते वर प्रश्नचिन्ह लागले होते, या सार्‍या पार्श्वभूमीवर आता या परीक्षा रद्द करण्यात आल्याचा निर्णय आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केला. परीक्षा रद्द केल्याचे मोबाईल वर मॅसेज  पाठवण्यात आले आहेत ,मात्र स्थानिक अधिकारी अजूनही यासंदर्भातील अधिकृत निर्णयाची वाट पाहत असून जोपर्यंत कागदोपत्री आदेश येत नाहीत तोपर्यंत आम्ही काही बोलू शकत नाही अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे

टिप्पण्या