अॅड. संगिता चव्हाण यांनी जिल्ह्यातील शेतकर्यांच्या नुकसानीची मांडली कैफियत
बीड: शिव जागृती न्यूज नेटवर्क
प्रलयाच रूप किती भीषण असतं, याचा अनुभव महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यातील नागरिकांना पहायला मिळाले असून गेल्या काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांच्या हातातोंडाशी असलेले संपूर्ण पिक वाया गेले असल्याने जिल्ह्यातील शेतकरी हैराण झाले असल्याने बीड जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहिर करून शेतकर्यांना तात्काळ मदत देवून शेतकर्यांना धिर देण्याचे काम आपल्या सरकारचे असल्याने महिला संपर्क प्रमुख संपदा गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अॅड. संगिताताई चव्हाण यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख मा.ना. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांची भेट घेवून जिल्ह्यातील शेतकर्यांची कैफियत मांडली.
शेतकर्यांचे कैवारी म्हणून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे अवघ्या महाराष्ट्रातील जनता पाहते. तसे तुम्ही कायम शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये पावसाने अतिकृपा दाखविल्याने शेतकर्यांचे होत्याचे नव्हते झाले आहे. जिल्ह्यातील संपूर्ण पिके पाण्याखाली असल्याने शेतकरी हैराण होत नैराशाखाली आला आहे. या शेतकर्यांना त्या नैराशातून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र प्रमुख म्हणून तुम्ही तात्काळ निर्णय घेणे गरजेचे असल्याने संपर्क प्रमुख संपदाताई गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या समवेत जिल्हाप्रमुख अॅड. संगिताताई चव्हाण यांनी आपले वार्षिक अहवाल सादर करत जिल्ह्यात काय परिस्थिती आहे याचाही लेखाजोखा दिला.यावेळी त्यांनी शेतकर्यांच्या मदतीबाबत तात्काळ निर्णय घेण्याची विनंती मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे केली. यावेळी संपर्क प्रमुख संपदा गडकरी, उपजिल्हाप्रमुख फरजना शेख यांच्यासह आदी शिवसेना नेते उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा