राज्यातील कर्मचाऱ्यांना वेगळा निर्णय व बीड जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना शासन निर्णय वेगळा का? नायब तहसिलदार ढाकणे यांच्यावर अनेक वेळा आरोप झाले असल्यामुळे त्यांची विभागीय चौकशी करून बदली करा - झेंड, गायकवाड,जावळे
पाटोदा *(गणेश शेवाळे)* महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना वेगळा शासन निर्णय व बीड जिल्ह्यात वेगळा आहे का असाच प्रकार बीड जिल्ह्यातील पाटोदा तहसिलमध्ये पाहिला मिळत असून पैशाच्या जोरावर नायब तहसिलदार सुनील ढाकणे हे गेल्या दहा वर्षा पासून पाटोदा तहसिल मध्ये कार्यरत आहेत त्याच्या डोक्यावर मोठा राजकीय आशीर्वाद व भरमसाठ पैसा असल्यामुळे त्यांची बदली पाटोदा तालुक्यातून गेली कितेक वर्षे होईना नायब तहसिलदार ढाकणे यांच्यावर डोक्यावर मोठाहात असल्यामुळे तहसिल मध्ये ते सर्व सामान्य नागरिकांना आरे रावीची भाषा वापरतात तर अनेक वेळा त्यांचावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तर अनेक विळा त्यांची बदली करावी म्हणून अनेक जनानी मागणी केली असताना ही ढाकणे यांनाच पाटोदा तहसिलदारच्या रिक्तजागेवर नेहमी तहसिलदार पद असो या नगरपंचायत मुख्यअधिकारी असो तहसिल मधील विविध विभागाचा चार्ज कसा मिळतो ही गंभीर बाब असल्यामुळे गेली दहा वर्षा पासून शासन निर्णयाला केराची टोपली दाखवत पाटोदा तहसिल मध्ये दबधरून बसलेल्या नायब तहसिदार ढाकणे यांची विभागीय चौकशी करून त्यांची तात्काळ बदली करावी अशी मागणी उपविभागीय अधिकारी कार्यालय पाटोदा यांच्यामार्फत मुख्यमंत्री,महसूल मंत्री,बीड जिल्हा अधिकारी यांना निवेदना द्वारे वंचित बहुजन आघाडीचे गोरख झेंड बाळासाहेब गायकवाड, सुनील जावळे,राहुल शिरोळे यांच्या सह इत्यादी ने केली असून नायब तहसिलदार ढाकणे यांची तात्काळ बदली झाली नाही तर आंदोलन करु असा इशारा पाटोदा वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने देण्यात आला आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा