पारधी हत्याकांड प्रकरणात न्याय मिळाला नाही तर मंत्रालयावर हजारोंच्या संख्येने मोर्चा काढणार - दिपक भाई केदार


 

पालकमंत्री व स्थानिक आमदाराला दलित समाजाचा विसर

 बीड :शिव जागृती न्यूज

दि.२७ 

मानवतेला काळीमा फासणारी घटना पाटोदा तालुक्यातील पारनेर येथे घडलेली आहे. पारधी समाजावर प्रति खैरलांजी सारखा हल्ला झाला आहे. चोरीच्या संशयावरुने जातीने पारधी असल्यामुळे हा हल्ला झाला आहे. २ वर्षाचा मुलगा जागीच ठार केला तर 10 जणांना गंभीर जखमी केलेले आहे. या घटनेत न्याय मिळावा यासाठी पीडित कुटुंबातील नातेवाईक तसेच पारधी समाजातील महिला ह्या जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे आल्या होत्या. यावेळी जिल्हाधिकऱ्यांना निवेदन देऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली.

पिडीत कुटुंबाने व महिलांनी पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न केला मात्र त्यांनी दुर्लक्ष करत भेट नाकारली.तसेच त्यांच्या सोबत असलेले स्थानिक आमदार यांनी देखील त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. त्यामुळे बीड जिल्ह्यातील अनु.जाती,जमाती, भटक्या विमुक्त यांच्याकडे जाणून बुजून सत्ताधारी दुर्लक्ष करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.


राज्यभर दलित पारध्यांना मारलं जातयं, इंग्रजांनी लावलेला कलंक आत पुसला जात नाही. पारधी जमातीचं अस्तित्व धोक्यात आले आहे, स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षांनंतरही या जमातीला माणूस म्हणून जगता येत नाही. ७० वर्षा ज्यांनी सत्ता हाकली, त्यांनी पारधी समाजाची अवस्था सामाजिक जीवनमान उचवले नाही. पारनेरची घटना गृहमंत्री यांनी गांभियान घ्यावी. तात्काळ पिडीत कुंटुंटबाला व राज्यातील संरक्षण द्यावे.

 सुनियोजित कट करून जातीयतेतुन चोरीच्या संशयवरून हल्ला झाला. बीड जिल्हत पारधी समाज सातत्याने मारला जातो. गाव जर वस्ती जाळत असेल, दोन वर्षाच्या मुलाची हत्या करत असेल,महीला अत्याचार करत असेल तर कायदा व सुसंस्था कुठंय. या सत्तेत अनुसुचित जाती-जाती, भटके-विमुकताना लायसन दिले आहे का ? गृहखातं अशा आरोपींना खतपाणी पाठराखण करत आहे का? असा संतप्त सवाल ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी केला आहे. त्यांच्यासोबत मराठवाडा उपाध्यक्ष नितीन सोनवणे,अशोक पाटील व पारधी समाजातील महिला भगिनी मुला-बाळासह मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सर्व आरोपींना तत्काळ अटक करा. 502, 376, 354, 120 (ब) अंतर्गत ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा.


कोंबीग ऑपरेशन करून सर्व आरोपींना अटक करावी.

 पिडितांचा तात्काळ चांगल्या दर्जाचा इलाज करावा. पिडितांचे मेडिकल करावे. पिडितांना तात्काळ संरक्षण द्यावे.

पिडितांना एक करोड रुपयांची आर्थिक मदत करून शासकीय नोकरी द्यावी. पिडित कुटूंबातील गायब आसलेल्या तरुणाचा शोध घ्यावा.

घटनेची सखोल चौकशी करावी.

घटनेतील आरोपींना अटक करावी, जो पर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत 2 वर्षांच्या मुलाने प्रेत ताब्यात घेणार नाही. अशी कुटूंबाची व संघटनेची भुमिका असून घटनेच्या निषेधार्थ निर्दयी व्यवस्थेच्या विरोधात "पारधी बचाव" आंदोलन करणार असल्याचे दिपक भाई केदार यांनी सांगितले.

-

टिप्पण्या