मुंबईतील महिला अत्याचार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करा - एसएफआय


 

महिलांवरील अत्याचार रोखण्यास अपयशी राज्य आणि केंद्र सरकारचा निषेध !


बीड : शिव जागृती न्यूज

९ सप्टेंबर रोजी मुंबईत साकीनाका येथे घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक घटनेत महिलेवर अमानुष अत्याचार करण्यात आला. अत्याचार करून तिला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. अखेर काल उपचारादरम्यान तिचा राजावाडी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. मुंबईसह महाराष्ट्र आणि देश हादरवणाऱ्या या घटनेचा स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) बीड जिल्हा कमिटी तीव्र निषेध करते. सदरील प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी एसएफआय करते.


तसेच केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार महिलांवरील अत्याचार रोखण्यात अपयशी ठरले आहे. नुकतीच दिल्लीत घडलेली घटना, पुण्यातील वानवडी येथील आणि देशात, राज्यात अनेक ठिकाणी होत असलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांनी देशभरात महिला सुरक्षित नसल्याचे स्पष्ट होते. महिलांवरील अत्याचार रोखण्यास अपयशी ठरलेल्या केंद्र आणि राज्य सरकारचा एसएफआय तीव्र धिक्कार करते.


मुंबईतील महिला अत्याचार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करा. महिला अत्याचाराला कायमचा आळा घालण्यात यावा. अशी मागणी एसएफआय करते. एसएफआय बीड जिल्हा कमिटी जिल्हयातील आपल्या सर्व तालुका समित्यांना, कार्यकर्त्यांना आणि विद्यार्थी वर्गाला आवाहन करते की, महिला अत्याचाराच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन संघर्ष उभा करावा. राज्यभरातील विविध जिल्ह्यांत आंदोलने संघटित करून महिला अत्याचार रोखण्यासाठी पुढे यावे. सर्व समविचारी विद्यार्थी संघटनांना एकत्र करून आपल्या जिल्ह्यात आंदोलन संघटित करावे. असे आवाहन संघटनेचे राज्य अध्यक्ष बालाजी कलेटवाड, राज्य सचिव रोहीदास जाधव, जिल्हा अध्यक्ष सुहास झोडगे,जिल्हा सचिव लहू खारगे,संतोष जाधव, विजय लोखंडे,अभिषेक शिंदे, संयोगीता गोचडे ,अशोक शेरकर, अंकुश कोकाटे, रामेश्वर जाधव, रामेश्वर आठवले, बाबासाहेब गायकवाड, शिवा चव्हाण, हनुमान शिंदे, विद्या सवासे, निकिता गोचडे, बालाजी कुंडकर, रवि राठोड, ऋषिकेश कलेढोण, शरद कुरकुटे, ज्योती दराडे, स्वाती घोडके, विजय राठोड आदी यांनी केले आहे.

टिप्पण्या