पाटोदा *(गणेश शेवाळे)* येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दि. २४ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजनेचा ५२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रोफेसर डॉ. किशोर मचाले होते. त्यांच्या हस्ते महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पमाल्यार्पण करण्यात आले. व्यासपीठावर पदव्युत्तर विभाग संचालक डॉ. मनोजकुमार प्रकाश, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. नंदकुमार पटाईत, पर्यवेक्षक प्रा. रमेश टाकणखार, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. गणेश पाचकोरे, डॉ. अनिता धारासूरकर, डॉ. प्रमोद गायके आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. गणेश पाचकोरे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्थापनेबाबत सविस्तर विश्लेषण केले तसेच रासेयोच्या स्वयंसेवकांनी देशभरात विविध प्रसंगी उद्भवलेल्या आपत्तींच्या प्रसंगी केलेल्या सामाजिक कार्याविषयी माहिती दिली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून युवकांना एक उत्तम व जवाबदार नागरिक म्ह्णून घडवले जाते असेही ते याप्रसंगी म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रमोद गायके यांनी केले. आभारप्रदर्शन प्रोफेसर डॉ. अनिता धारासूरकर यांनी केले. कार्यक्रमास रासेयो स्वयंसेवक, रासेयो समितीचे सदस्य प्रा. अशोक नागरगोजे, डॉ. पंडीत सिरसट, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा