ओला दुष्काळ जाहीर करा ; हेक्टरी सरसकट ५० हजार नुकसान भरपाई द्यावी -दीपक तांबे यांची मागणी


 

पाटोदा: शिव जागृती न्यूज नेटवर्क

बीड जिल्ह्यात पुनः पुन्हा अतिवृष्टी झाली आहे.अगोदर कोरड्या दिवसांमुळे आणि आता अतिवृष्टीमुळे पिकांचे पूर्णत: नुकसान झाले आहे.बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रूपयांची भरपाई शासनाने द्यावी,अशी मागणी सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष दीपक तांबे यांनी केली आहे.


दीपक तांबे म्हणाले की,यंदा अगोदरच शेतकरी कोरोना लॉकडाऊनमुळे अडचणीत आला.त्यात पावसाने उघडीप दिल्याने खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही विमा कंपनीने शेतकऱ्यांना विमा भरपाईची अग्रीम रक्कम दिली नाही.त्यात पुन्हा ऑगस्टच्या शेवटी आणि दिनांक चार ते सात सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीने जिल्ह्यात हाहाकार माजविला.त्यामुळे सोयाबीन, उडीद, मूग,कपाशी,बाजरी,ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले.नद्यांना पुर आल्याने जमिनी वाहून गेल्या.अनेक ठिकाणी जीवीतहानीही झाली.

पाटोदा तालुक्यात अतिवृष्टीने मोठे नुकसान केले.आता त्यातून काही उरलेले खरीप पिके दोन दिवसांपासून झालेल्या पावसाने पूर्ण हातातून गेली आहेत.काढून टाकलेले सोयाबीन कुजून गेले आहे.तूर,कपाशी पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे.अशा कठीण काळात राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.केवळ पंचनाम्यांचा फार्स करू नये.सर्वत्रच मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रूपये मदत द्यावी,अशी मागणीही दीपक तांबे यांनी केली.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा