आदर्श शिक्षक आशोक पवार यांचा पाटोदा पंचायत समिती मध्ये सत्कार



पाटोदा (गणेश शेवाळे) तालुक्यातील कोतन जि.प. प्राथमीक शाळेचे शिक्षक आशोक पवार यांना बीड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्यामुळे पाटोदा पंचायत समितीच्या वतीने पंचायत समिती कार्यालयात गुरुवार दि. २३ रोजी सभापती साै.सुवर्णाताई लांबरुड, उपसभापती देविदास शेंडगे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

 यावेळी बोलताना सभापती लांबरुड म्हणाल्या की,पवार सरांच्या शैक्षणिक कामाची दखल घेऊन बीड जिल्हा परिषदेने त्यांना सन.२०२० -२१ चा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आल्याने त्यांनी पाटोदा तालुक्याचे नाव रोशन केले असल्याचे प्रतिपादन केले.तालुक्यातील ईतर शिक्षकांनी पवार सर यांचा आदर्श घेऊन शैक्षणिक कार्य केल्यास आपणास ही आदर्श पुरस्कार मिळु शकतो. तालुक्यातील शिक्षकांनी योग्य प्रकारे ज्ञान दान करून विद्यार्थी घडवावेत असे आवाहन त्यांनी केले.

 यावेळी गटविकास अधिकारी अनंत्रे, गटशिक्षण अधिकारी शेळके, काकासाहेब लांबरुड, सरपंच पांडुरंग नागरगोजे, सरपंच दिपक तांबे, शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष रमेश नागरगोजे, बापु मळेकर, शांताराम ढेरे, हरीदास तांबे, नवनाथ घुमरे, जालिंदर बेदरे, राजेंद्र घुमरे, विष्णु सांगळे यांच्यासह अनेक शिक्षक उपस्थीत होते.

टिप्पण्या