दसरा सणाच्या अगोदर संजय गांधी श्रावण बाळ योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर टाका नसता आंदोलन करू - रामेश्रर जाधव
पाटोदा *(गणेश शेवाळे )* हिंदू धर्माचा पवित्र असा असणारा सन दसरा जवळ आला असून पाऊसामुळे शेतकऱ्यांच्या हाताला आलेले पिके वाया गेल्याने सामान्य नागरिक व शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने पाटोदा तालुक्यातील संजयगाधी, श्रावणबाळ योजनेतील इतर लाभार्थ्यांना ही पाटोदा तहसीलने तात्काळ पैसे खात्यावर टाकले पाहिजे यामुळे सर्वसामान्य नागरिक शेतकरी व दिव्यांगाची दसरा सण गोड जाईल यामुळे दसरा सणा अगोदर लाभार्थ्यांच्या खात्यावर संजय गांधी श्रावणबाळ योजनेतील पैसे खात्यावर जमा करावे नसता आमदार सुरेश धस मिञमंडळाच्या वतीने पाटोदा तहसीलच्या दारात आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित रामेश्वर जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा