निरगुडीमध्ये ऐतिहासिक ग्रामसभा गावकर्याकडुन सरपंचाच्या चांगल्या कामाचे कौतुक


 

 ➡️ सर्वाना सोबत घेऊन गावाचा विकास करणार.. सरपंच उपसरपंच यांचा गावकऱ्यांना शब्द 

पाटोदा *(गणेश शेवाळे)* गावाला एक चांगला सरपंच भेटला तर गावाचे काय होऊ शकते, यांचे आदर्श उदाहरण म्हणजे पाटोदा तालुक्यातील निरगुडी काही महिन्यापुर्वी निरगुडीमध्ये निवडणुका झाल्या यामध्ये शिवाजी शेलार,संतोष बेद्रे  यांच्या पँनलला मतदारानी बहुमत देऊन निरगुडी ग्रामपंचायत सत्तेची चावी हातात दिली.यामुळे लोकांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ नये,म्हणून निरगुडीच्या विकासासाठी शिवाजी शेलार व संतोष बेद्रे धडपड करत असून आज निरगुडी करांना ग्रामसभा काय असते? हे पहिल्यांदाच पाहिले व स्वातंत्र्याचे महत्त्व पटले.


मंदिराच्या पारावर गांधी जयंती निमित्त निरगुडी  ग्रामपंचायतने ग्रामसभेचे आयोजन करून  गावातील सामान्य जनतेचे प्रश्न जाणून घेऊन ते 100% सोडवण्याचा प्रयत्न आमदार सुरेश अण्णा धस यांच्या मार्गदर्शनाखाली करु,तसेच जास्तीत जास्त गावचा विकास कसा होईल या साठी पण प्रयत्न करू असा शब्द सरपंच उर्मिला शिवाजी शेलार,युवानेते संतोष बेद्रे यांनी गावकऱ्यांना दिला.या सभेला पाटोदा पं.स.चे विस्तार अधिकारी जाधव साहेब, ग्रामसेवक वाघुले साहेब  ग्रामपंचायत सदस्य,तसेच  गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावात पहिल्यांदाच ग्रामसभा होत असल्याने सर्व नागरिक मोठ्या संख्येने  निरगुडी मधील ऐतिहासिक ग्रामसभे मध्ये सामिल झाले सरपंच उर्मिला शिवाजी शेलार व संतोष बेद्रे यांच्या चांगल्या कामाचे गावकरी कौतुक करत आहेत.

टिप्पण्या