पारनेर च्या सरपंच यांनी स्वतःच्या कुटूंबातील व्यक्तीच्या नावे लाखो रुपये निधी वितरित केल्या मुळे जिल्हाधिकारी यांनी केलं अपात्र
■ परशु मेरड व अनिल क्षीरसागर यांनी केला होता पाठपुरावा!
पाटोदा : शिव जागृती न्यूज
सत्तेची सूत्रे हातात आली की आपण मालक आहोत या पद्धतीने सत्ता उपभोगत भ्रष्टाचार केला जातो.
मांजर डोळे मिटून दूध पिते याचा अर्थ जग पाहत नाही असा होत नाही .रीतसर तक्रार आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्या नंतर कितीही मोठी शक्ती भ्रष्टाचारराला वाचवत असेल तर नियती आणि नीती यास धडा शिकवल्या शिवाय राहत नाही.याचाच प्रत्यय पाटोदा तालुक्यातील पारनेर या ग्रामपंचायत च्या सरपंच अपात्र प्रकरणात आला.
लोक नियुक्त सरपंच श्रीमती अर्चना संतोष नेहरकर यांच्यावर सतत दोन वर्षांपासून भ्रष्टाचार/गैरव्यवहार केल्या मुळे तक्रारी व चौकश्या चालू होत्या परंतु तक्रार दार यांनी सतत पुरावे निशी पाठपुरावा केल्या मुळे अखेर प्रकरण निकाली लागले व गैरव्यवहार सिद्ध झाल्यामुळे मा.जिल्हाधिकारी यांनी दि.05-01-2022 रोजी सरपंच यांना अपात्र केलं आहे.
◆यापूर्वी मा.अपरआयुक्त ,औरंगाबाद यांनी सरपंच यांना एका प्रकरणात दि.09-12-2021 रोजी अपात्र केलं आहे. ◆
अशा पद्धतीने सर्व आरोप सिद्ध झाल्याने सरपंच यांना त्यांचे पद रिक्त झालं आहे व भ्रष्टाचार सिद्ध झाल्याने पुढील कारवाई काय होईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहेत.
■ सरपंच व कुटुंबीयांनी कसा केला भ्रष्टाचार!
14 वित्त खाते मधून सरपंच यांनी स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावे रक्कमा काढलेली माहिती खालील प्रमाणे
1.सरपंच पती -संतोष जाणू नेहरकर यांच्या नावे- 102430/- रुपये .
2.सरपंच यांचे सासरे -जाणू पांडुरंग नेहरकर यांच्या नावे -169500/-रुपय.
3.सरपंच यांचे दीर -धनंजय जाणू नेहरकर यांच्या नावे -203165/-रुपये.
4.सरपंच यांचे दुसरे दीर -हनुमंत जाणू नेहरकर यांच्या नावे -353802/-रुपये .
अशी एकूण रक्कम -828897/- रु स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावे काढल्याचे सिद्ध!
■ सत्य परेशान हो सकता है! लेकीन पराजित नही - परशु मेरड
गावातील गरीब लोकांच्या तोंडचे पाणी पळवण्याचे राजकारण ज्यांनी केले त्यांना न्यायाने अद्दल घडली आहे.सत्ता लोकांची सेवा करण्यासाठी असते मेवा खाण्यासाठी नसते हेच सिद्ध झाले आहे. दुष्काळात घोटभर पाण्यासाठी लोक त्रस्त असताना पाण्याच्या विकासात हात काळे करणाऱ्या मानसिकतेला झटका देणारा हा निकाल आहे.भृष्टाचार खपवून घेणार नाही,लोकासाठी लढू आणि जिंकू असे मत या लढ्याच्या पाठीशी असणाऱ्या परशु मेरड यांनी माध्यमांशी बोलताना नोंदवले.गावकरी या भृष्टाचार मुक्तीच्या लढ्यात सोबत राहिले, त्याच्याच एकीचा आणि नेकीचा हा विजय असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा