डोंगरकिंन्ही ते चुंबळी घाटातील पैठण पंढरपूर रस्त्याचे तीन वर्षापासून रखडलेले काम तातडीने पूर्ण करा अन्यथा बेमुदत ठिय्या आंदोलन -सुशील तांबे
पाटोदा: शिव जागृती न्यूज
पाटोदा तालुक्यातील चुंबळी ते डोंगरकिंन्ही दरम्यान असलेल्या व अत्यंत धोकादायक घाटाचे काम तीन वर्षापासून रखडले आहे. उभी चढण असलेल्या घाटात रस्ता खोदून ठेऊन तीन वर्ष उलटली. येथील कंत्राट दराने आपली यंत्रणाही दुसऱ्या कामावर नेली आहे. या रस्त्यावर पडून दुखापत होण्याच्या घटना रोज होतात. बरेच लोक जायबंदी ही झालेत. पण प्रशासनाला याची साधी दखलही घेऊ वाटत नाही. हा रस्ता पैठण पंढरपूर या महामार्गावर आहे. या १किलो मीटर च्या घाटाचे काम तत्काळ करण्यात यावे अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष सुशील तांबे यांनी तहसील तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री राज्य व केंद्र, जिल्हाधिकारी यांना संयुक्त रित्या निवेदन द्वारे केलीय.
याची दखल जर घेतली गेली नाही तर डोंगरकिन्ही आणी पंच क्रोशितील नागरिकांना बरोबर घेऊन बेमुदत ठीय्या आंदोलन करण्याचा इशारा निवेदन द्वारे देण्यात आला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा