पाटोदा: शिव जागृती न्यूज
पाटोदा तालुक्यातील पैठण पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मळेकरवाडी घाटातील एक कि मी चे काम तात्काळ पुर्ण करण्याचे आदेश आ सुरेश धस यांनी गुत्तेदारांस देताच हे काम लवकरच पुर्ण होणार असुन प्रवाशांची त्रासापासून सुटका होणार आहे असे या घाटातील कामासाठी सततचा पाठपुरावा करणारे डोंगरकिन्ही जि प गटप्रमुख अनिलशेठ काथवटे यांनी सांगितले आहे.
पैठण पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग पाटोदा तालुक्यातुन डोंगरकिन्ही हुन मळेकरवाडी घाटातुन जातो .सत्यसाई कन्स्ट्रक्शन कंपनी लातुरकडे हे रस्ताबांधणीचे काम होते.हा पुर्ण रस्ता सिमेंटचा झाला मात्र गुत्तेदाराने गावातील जंक्सन ,बसस्थानक परिसरातील नाल्या तसेचउतारा वरील रहिवासी वस्त्यांसाठी संरक्षण कठडे ही कामे अर्धवट सोडून दिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे मळेकरवाडी घाटातील काम कोणतेही कारण किंवा अडवणूक नसतानाही अर्धवट सोडून दिले होते. हा रस्ता इतका खराब झाला आहे की ,जनावरांना ही चालणे अशक्यच तर प्रवाशांना त्रासदायक ठरत आहे. चढाचा रस्ता असल्याने वाटमारीचीही शक्यता आहे .या साठी डोंगरकिन्ही जि प गटाचे प्रमुख अनिलशेठ काथवटे यांनी सततच पाठपुरावा केला .काथवटे यांनी आ सुरेश धस यांच्या कडे आग्रही मागणी केली आ धस यांनी सत्यसाई कन्स्ट्रक्शन कंपनीच्या व्यवस्थापन अभियंता यांच्याशी संपर्क साधून हे तात्काळ करण्याचे आदेश दिले कंपनी व्यवस्थापनाने काम पुर्ण करण्याचे आश्वासन दिलं व यंत्रणाही कामासाठी पाठवली .परिणामी मळेकरवाडी घाटातील काम लवकरच पुर्ण होणार असुन प्रवाशांची त्रासापासून मुक्तता होणार आहे असे अनिलशेठ काथवटे यांनी सांगितले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा