पाटोदा : शिव जागृती न्यूज
देशाचा चौथा स्तंभ म्हणून इलेक्ट्रॉनिक मिडिया, वृत्तपत्राच्या माध्यमातून पत्रकार समाजाला दिशा देण्याचे काम व लोकशाही जीवंत ठेवण्याचे काम पत्रकार आपल्या लेखणीच्या माध्यमातून करत असतो.परंतु सध्याच्या काळात सत्य परिस्थिती आपल्या लेखणीतूूून कोणी मांडण्याचे प्रयत्न केले तर अनेकांना अडचणी निर्माण होतात त्यांत अनेकांना आपले प्राण हि गमवावे लागले आहेत. पत्रकारांना न्याय व हक्कासाठी अनेक संघटना ग्राऊंडवर उतरून काम करत आहे.यामध्ये अखिल भारतीय जर्नालिस्ट फेडरेशन नवी दिल्ली हि जर्नालिस्ट युनियन पुर्ण देशात पत्रकारांसाठी काम करत आहे. पत्रकारिता सोबतच समाज हिताचे काम ( कोरोना १९ च्या प्रादुर्भावात,दुष्काळ परिस्थितीत,) अश्या अनेक कामे संकटकाळात ग्राऊंडवर उतरून काम करणाऱ्यां पत्रकारांना यामध्ये मानसन्मान दिला जात आहे. पाटोदा तालुक्यातील पत्रकार हमीदखान पठाण यांनी दुष्काळात लोक सहभागातून पाटोदा शहरात काही भागात शुध्द पिण्याच्या पाण्याची सोय,तसेच कोवीड १९ मध्ये गोरगरिबांना किराणा,व सतत असंघटित इमारत बांधकाम कामगारासाठी काम करत आहे.तसेच आपल्या लेखणीच्या माध्यामातून पैठण ते पंढरपूर मुंगगाव ते सावरगावघाट,पाटोदा ते ढाळेवाडी तसेच नगरपंचायत,महसूल विभाग.तसेच पत्रकारावर झालेल्या हल्ले विरोधात आवाज उठविले असल्याने.अखिल भारतीय जर्नालिस्ट फेडरेशनचे प्रदेशाध्यक्ष शेख शरिफ बागवान,अनिल वसंत पवार, खलिल सुर्वे,
फोरोज पिजारी, यांनी त्यांच्या कामाची दखल घेत ता.अध्यक्षापासून थेट जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे. हमीदखान पठाण गेल्या तीन वर्षांपासून फेडरेशनचे काम जबाबदारीने करत असल्याने त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याचे वरिष्ठ पदधिकारी यांनी सांगितले आहे. या निवडीबद्दल तालुक्यासह जिल्ह्यातून त्यांच्यावर शुभेच्छेचा वर्षाव होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा