कसलाही हेपल्लापणा न करता, कायम जनतेच्या कामात आसनारे आमदार आजबे

 




मतदारसंघाच्या विकासासाठी बाळासाहेब आजबे मंत्र्यांच्या भेटीला

पाटोदा : शिव जागृती न्यूज

 आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच नेत्यांनी कंबर कसली आहे. आष्टी मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी बड्या मंत्र्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. 

सध्या कोरोनाचे संकट थोडेफार कमी झाल्याने बाळासाहेब आजबे यांनी सर्व मंत्र्यांच्या दारोदारी जाऊन आष्टी मतदार संघाच्या विकासासाठी लागणारा निधी गोळा करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या सातत्याने भेटी घेत होते. आरोग्य ग्रामविकास संदर्भातील सर्व कामांच्या फाईली तात्काळ मंजूर करुन घेण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यांचे प्रयत्न पाहून बाळासाहेब आजबे यांच्याकडून जनतेच्या देखील अपेक्षा वाढल्या आहेत. आगामी काळात आष्टी मतदारसंघाचा कायापालट होईल, यात तीळमात्र शंका नाही, असेच सध्या दिसत आहे.

बाळासाहेब आजबे यांची कार्यशैली पाहून आजबे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतील यात शंका नाही. त्यांनी आजपर्यंत विविध विकास कामांचा शुभारंभ केला आहे. आगामी काळात हेच कार्य अधिक वाढेल आणि जनतेला आधार देतील त्यांच्या अपेक्षा पूर्ण करतील, असेच चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे.कसलाही हेपल्लापणा, आरडा- ओरडा, गोंधळ न करता, कायम जनतेच्या कामात आसनारे आमदार आजबे यांनी सर्व सामान्य माणसाच्या मनात जागा केली आहे.

टिप्पण्या