निराधारांचा आधार हरपला; दलितमित्र समदभाई यांचे निधन


 


पाटोदा : शिव जागृती न्यूज

पाटोदा ग्रामपंचायतचे मा.सदस्य तथा साप्ताहिक युवायुगचे संपादक दलित मित्र अब्दुल समद नबी शेख यांचे दि.३० जानेवारी रविवार रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास बीड येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान  निधन झाल्याने पाटोदा तालुक्यातील निराधारांचा आधार हरपला .

   समद भाई यांनी दिन दलित,निराधार यांच्यासाठी खुप संघर्ष केला होता. जेव्हा जेव्हा श्रावणबाळ,संजयगांधी निराधारांना अडचण निर्माण झाली तेव्हा ते रस्त्यावर उतरून संघर्ष करत त्यांना न्याय मिळवून देत होते. त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांना दलित मित्र या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.समद भाई आपल्या साप्ताहिक युवायुग व प्रत्येक चौकात लावलेल्या बोर्डाच्या माध्यमातून नागरिकांना चालू घडामोडी, सुविचार आदिची माहिती देत होते.त्यामुळे सकाळच्या प्रहारात प्रत्येक चौकात बोर्ड वाचण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असत.परंतु मागील एक ते दिड वर्षांपासून त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.  मात्र वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर दर्गावाली कब्रस्तान येथे रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दफनविधी साश्रुनयनात  करण्यात आला .स्व  समद भाई यांच्या पश्चात पत्नी,२ मुले,४ भाऊ,२ बहीण, असा मोठा परीवार आहे.शेख कुटुंबाच्या  दुःखात शिव जागृती न्यूज परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या