पाटोदा : शिव जागृती न्यूज
पाटोदा नगर पंचायतचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलांसाठी राखीव सुटले असून, पहिल्या अडीच वर्षासाठी आ. सुरेश धस यांचे कट्टर समर्थक माजी नगर पंचायत सभापती राजू भैय्या जाधव यांच्या पत्नी सौभाग्यवती दिपालीताई राजू जाधव यांची वर्णी लागणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
राजू भैय्या जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून आ. सुरेश धस यांचे समर्थक म्हणून काम करीत आहेत. एक होतकरू कार्यकर्त म्हणून त्यांची ओळख आहे. चांगले संघटन कौशल्य असल्याने त्यांना आ. सुरेश धस यांनी गत निवडणुकीत काम करण्याची संधी दिली होती. सर्वांशी मिळून मिसळून काम करणारा नगरसेवक म्हणून त्यांची तालुक्यात ओळख आहे. त्यानी आपल्या पाच वर्षाच्या नगरसेवक पदाच्या काळात वार्डाच्या मुलभूत गरजा यामध्ये पाणी, वीज, रस्ते शौचालय, नाले स्वचछता आदी कामे स्वतः उभी राहून करून घेतली. एवढेच नव्हे तर नागरिकांना फिल्टर केलेले पाणी मिळावे यासाठी पाण्याचे ए टी एम मशीन वॉर्डांत बसविले आहेत. एक विकासाची दिशा असणारा कार्यकर्ता कसा असावा याचे उदाहरण म्हणजे राजू जाधव. या कामगिरीचे बक्षिसी म्हणून आ. सुरेश धस यांनी राजू जाधव यांच्या पत्नी दिपाली राजू जाधव पुन्हा नगर सेविका पदाची संधी दिली. मोठ्या मतांनी निवडून आल्या असून, एक सुशिक्षित नगरसेविका पाटोदा शहराला मिळाल्या आहेत.
नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्व साधारण महिलांसाठी राखीव सुटले असून, भाजपकडे एकमेव सुशिक्षित नगरसेविका म्हणून दिपाली राजू जाधव या आहेत.
पाटोदा शहरातील सामाजिक, सांस्कृतिक असो की रक्तदान शिबिर असो की राजकीय आंदोलने असो राजू जाधव कार्यक्रमात नेहमी अग्रेसर असणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. काही वर्षांपूर्वी राष्ट्रीयकृत बँकेत शेतकरयांना कर्ज मिळत नसल्याने बँकेच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी राजू जाधव हेच पुढे आले होते. असा लढवय्या कार्यकर्ता, कसल्याही वादात नसल्याने एक चांगले व्यक्तीमत्व म्हणून ओळख आहे. यामुळे आ. सुरेश धस हे राजू जाधव यांच्या पत्नी दिपाली राजू जाधव यांना नगराध्यक्ष पदाची संधी देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा