ऑक्सीतेज' दर्जात कमी पडणार नाही: आ.सुरेश धस


 

संत महंतांच्या उपस्थितीत शुभारंभ


बीड: पाणी हे जीवन असून शुध्द पाणी शरिरासाठी आवश्यक आहे. सद्या पाण्याचे अनेक बँ्रड बाजारात स्पर्धा करत आहेत, परंतु दर्जाबाबतीत ते लक्ष देत नाहीत. 'ऑक्सीतेज मिनरल वॉटर' मात्र दर्जा कायम राखेल आणि राज्यात नावारूपाला येईल, असा विश्वास आ.सुरेश धस यांनी व्यक्त केला. ऑक्सीतेजच्या शुभारंभप्रसंगी आ.धस बोलत होते.


उंखडा (ता.पाटोदा) येथे जिल्हा परिषद सदस्य ॲड.प्रकाश कवठेकर यांनी तरूणांच्या हाताला काम आणि दर्जेदार पाणी देण्यासाठी 'ऑक्सीतेज' कंपनी सुरू केली आहे. कंपनीच्या उदघाटन प्रसंगी श्री.क्षेत्र नारायणगडाचे मठाधिपती महंत ह.भ.प.शिवाजी महाराज, ह.भ.प. राधाताई महाराज, ह.भ.प.शिवाजी महाराज येवले यांची उपस्थिती होती. कार्यक्रमला अध्यक्ष म्हणून आ.सुरेश धस उपस्थित होते तर रूक्मीनी विठ्ठल कवठेकर यांच्या हस्ते ऑक्सीतेजचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले, पाणी आणि वाणी जपुन वापरणे आवश्यक आहे. सद्या आरोग्याकडे सर्वच जण लक्ष देऊ लागले असून आता चांगले पाणी पिण्यावर लोकांचा भर आहे. हेच लक्षात घेवून ऑक्सीतेज काम करेल. काँटीटीपेक्षा क्वॉलीटी जपणे आवश्यक असून दर्जावरच ब्रँडचे भवितव्य अवलंबून असते, यामुळे ऑक्सीतेज दर्जा राखेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपाचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, जिल्हा परिषद सदस्य अमरराजे निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य माऊली जरांगे, उद्योगपती दीपक बांगर, बीड पंचायत समिती सभापती बळीराम गवते, चार्टर्ड अकाउंटंट बी.बी.जाधव, भाऊसाहेब भवर, बाळासाहेब पवार, अधीक्षक कारागृह अधीक्षक भोईटे, कारागृह अधिक्षक महादेव पवार, कामगार पत संस्थेचे चेअरमन दत्तात्रेय गुट्टे, सारांश अर्बन चेअरमन नरसिंग शिरसाट, नगरसेवक प्रा.पवन मुंडे, उद्योगपती विकास सातव, जयमल्हार बागल, माई पवार, सरपंच शाहेद, उद्योगपती रघुनाथ फड, नवनाथ नागरगोजे, सुभाष शेप, समाजसेवक गणेश उगले, सुरेश राजहंस, विनोद रोडे, दीपक चकोर, संतोष डांगे, माजी जिल्हा परिषद सभापती महेंद्र गर्जे, पाटोदा समिती सभापती काकासाहेब लांबरुड, विजय लाटे, अशोक सुखवसे, अनिल काथवटे, संतोष कोळपकर, आप्पासाहेब येवले, भाऊसाहेब तुपे, हनुमान शेलार, संतोष बेद्रे, रवी रांजवान, शेषराव कदम, संभाजी येवले, नामदेव जाधव, अभिमान काठले, दादासाहेब पवार, उत्रेशवर जाधव, शिवाजी जाधव, दत्ता घरत, गणेश ढवळे, दत्ता जाधव, गणेश मुंडे, दीपक तांबे, महादेव जायभाये, किरण चौरे, बाळासाहेब चौरे, संजय आगे, नवनाथ डोळस, प्रा.पंडित तुपे, प्रा.चंदा बेग, जगताप तात्या, उद्योगपती परमेशर येवले, संतोष कवठेकर, दिनेश जाधव, लोले, केशव रसाळ, मिलिंद काळे, भाऊसाहेब नलावडे, गुलाब थोपटे, सालार पठाण, अशोक सुपेकर, राधाकिसन तुपे, नाना इंगोले, पांडुरंग नागरगोजे, रतन बहिर, दादा जगताप, जकिर शेख, रामभाऊ सानप, अतूल मकाळ आदी उपस्थित होते.

टिप्पण्या