डोंगरकिन्ही येथिल शाळा इमारतीच्या बांधकामास सुरुवात
पाटोदा: शिव जागृती न्यूज
पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही येथिल जि प च्या माध्यमिक शाळा ईमारतीचा प्रश्न मार्गी लागला असुन विधानपरिषद सदस्य आ सुरेश धस यांनी डोंगरकिन्ही करांचा विश्वास सार्थ ठरवला असुन त्यांच्या नेतृत्वाखाली डोंगरकिन्ही येथिल रोजाची दैनावस्था फिटली असुन या जागेवर जि प मा शाळेची विलोभनीय इमारत होणार आहे अशी माहिती डोंगरकिन्ही जि प गटाचे प्रमुख अनिलशेठ काथवटे व गण प्रमुख भागवत येवले यांनी दिली
पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही येथिल जि प माध्यमिक शाळेची ईमारत ही १९६० सालची होती .ही ईमारत अगदीच जिर्ण झाली होती .तीस वर्षापासून या शाळेच्या ईमारतीच्या भावनिक प्रश्नावर अनेक स्थानिक निवडणुका झाल्या अनेक आश्वासने मिळाली .तरीही या शाळेच्या ईमारतीचा प्रश्न जैसे थेच होता.
आ सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली येथिल जि प सदस्य प्रकाश कवठेकर ,पंचायत समिती सदस्य विद्याधर येवले, सरपंच प्रा बापु रायते ,उपसरपंच नारायण बप्पा येवले, माजी सरपंच आप्पासाहेब येवले, आर आर येवले, देविदास कोळपकर सर्व ग्रा प सदस्य शिक्षण प्रेमी नागरिक व ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेऊन शाळा ईमारती साठी प्रयत्न केले .तीस वर्षापासून जिर्ण झालेल्या इमारतीत या परिसरातील विद्यार्थीचे जिव टांगणीला होते .एकुण चार वेळेस दुरूस्तीचे काम झाले .शाळा डोंगरकिन्ही येथिल रोजा परिसरातील जागेवर प्रशस्त इमारत उभी राहत आहे डोंगरकिन्ही येथिल याच जि प शाळेतुन शिकुन या परिसरातील अनेक विद्यार्थी अधिकारी ,शिक्षक, कर्मचारी झाले असुन ते आज प्रशासकीय सेवेत आहेत .तेच वैभव नवीन ईमारतीमुळे या शाळेला प्राप्त होणार आहे .
या शाळा इमारतीच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीने शंभर लक्ष निधी मंजूर केला असुन ही ईमारत एक उत्कृष्ट बांधकाम होणार असुन आ सुरेश धस यांनी डोंगरकिन्ही करांना नवीन वर्षाच्या सुरुवातीला च भेट दिली आहे अशी माहिती गट प्रमुख अनिलशेठ काथवटे व नारायणबप्पा येवले यांनी दिली आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा