पाटोदा : शिव जागृती न्यूज
पाटोदा तालुक्यातील धनगरजवळका येथील रहीवाशी अनंता श्रोते यांच्या घरामध्ये दुपारी 2:15 च्या दरम्यान शाॅर्टसर्कीट मुळे फ्रिज ला आग लागली परंतु शेजारी असणारे पञकार नानासाहेब ड़िड़ूळ व त्याच्या पत्नी अंजना ड़िड़ूळ यांनी घटनास्थळी धाव घेतली व कुठला ही विचार न करता पक्कड़ च्या साहाय्याने येणारा मेन विजेचा वायर कट केला त्यामुळे लाईट चा संपर्क तुटला परंतु फ्रिज ने पेट घेतला होता जवळच गॅस होता जर संपर्क नसता तोड़ला तर गॅस सिलेंड़र चा मोठा स्फोट झाला असता .
बघता बघता अनंता श्रोते यांच्या घरातील फ्रीज , मिक्सर, कपड़े ,जिवन उपयोगी वस्तू जळुन खाक झाल्या अंदाजे पंन्नास हजाराची नुकसान झाली .
घटनेची माहिती होताच गावातील मैनुदिन शेख, महेश संचेती,मल्हारी ढेकळे यांनी धाव घेतली व वयोवृद्ध अनंता श्रोते व सुरेखा श्रोते यांना धिर दिला .
परंतु जिवीत हानी टळली म्हणून सर्व धनगरजवळका गावामध्ये पञकार नानासाहेब ड़िड़ूळ यांचे कौतुक होत आहे.
महावितरण च्या गलथान कारभारामुळे माझ्या सारख्या गरीबाचे पन्नास हजाराचे नुकसान झाले
अनंता श्रोते (धनगरजवळका ) .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा