तांबाराजुरी येथील शिवजन्मोत्सव थाटात संपन्न

 




पाटोदा: शिव जागृती न्यूज


पाटोदा तालुक्यातील तांबाराजुरी येथील गेल्या 9 वर्षांपासून सुरू असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित शिवजन्मोत्सव मोठे स्वरुप प्राप्त करत असून परिसरातील घराघरात आणि मनामनात पोहचला असल्याने तांबाराजुरी येथील शिवजयंती कार्यक्रमाची पाटोदा तालुक्यात कौतुकाने चर्चा होत आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शिवजन्मोत्सवाचे तीन दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.


 दि.17 रोजी शाळा काॅलेज च्या विद्यार्थी वकृत्व स्पर्धा, तसेच बीड ब्लड बँक यांच्यासहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी 38 रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले, रात्री 8.00 वाजता शिवव्याख्याते रुपेश राजे बेदरे यांचे व्याख्यान झाले. शिवरायांचे बालपण शिवरायांचे स्वराज्य राज्याभिषेक आणि शिवरायांनी केलेल्या कार्याविषयी रुपेश राजे बेदरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


दि.18 रोजी

शाळकरी मुलींची रांगोळी स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धेमध्ये मुलींनी तसेच मुलांनीही या स्पर्धेत सहभाग नोंदवला. रात्री आठ वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिव किर्तनकार ह भ प अतुल महाराज येवले यांचे युवा पिढीला दिशादर्शक शिवकिर्तन झाले. यावेळी समाजांमधील त्यांनी अनेक रूढी परंपरावर प्रबोधन केले, छत्रपती शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांवर , मावळ्यांवर किती प्रेम आहे हे त्यांनी आपल्या प्रबोधनातून मांडले.यावेळी ह भ प शिवानंद महाराज भारती, हभप बळीराम महाराज मस्कर, देवकर महाराज, तसेच याप्रसंगी तांबा राजुरी गावचे सुपुत्र, भूमिपुत्र मेजर शेख अनिस हुसेन हे सतरा वर्षे सेवा पूर्ण करून भारतीय सैन्य दलातून निवृत्त झाल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. गावातील परिसरातील ग्रामस्थ टाळकरी,भजनी मंडळ, माता भगिनी,लहान-थोर अनेक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


दि.19 रोजी सकाळीच 7 वाजता गावातील सर्व विद्यार्थी, युवकांची प्रभातफेरी काढण्यात आली. संपूर्ण गावातून निघालेल्या प्रभातफेरी मध्ये अनेक मुले आणि मुलींची बालजिजांऊ, बालशिवाजी यांच्या छान दिसणाऱ्या वेशभूषा, संपूर्ण गावातील सर्व रस्त्यांवर स्वच्छता करून रांगोळी काढून प्रभातफेरी चे ठिकठिकाणी होणारे नेत्रदिपक स्वागत, प्रभातफेरी मध्ये सर्व मुलांमुलींच्या अनेक शिवघोषणां, प्रभातफेरीचे स्वागतासाठी गावकऱ्यांचा उस्फूर्त सहभाग, परिसरातील अनेक ठिकाणी व घरोघरी तसेच प्रभातफेरी मधील भगव्या शिवपताकां - झेंडे ,शिवजन्मोत्सवात लहान मोठ्या सर्वांचीच शिस्त लक्ष वेधून घेत होती.


तांबाराजुरी शिवजन्मोत्सव समारोप कार्यक्रमात आज कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच दिपकराव तांबे तात्या, व प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक सानप सर, गाडेकर मॅडम, कर्डीले मॅडम, माजी उपसरपंच गणेश तांबे, गंगाधर तांबे फौजी यांच्या हस्ते सामुदायिक जिजाऊं वंदना आणि शिवआरती घेण्यात आली. तसेच सर्व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.


यावेळी काहीं निवडक मुला मुलींची भाषणे झाली. रांगोळी स्पर्धा, भाषण स्पर्धा तील विजेत्यांना बक्षीस वाटप करण्यात आले, तसेच रक्त दान केलेल्या सर्व युवकांना बीड ब्लड बँक यांच्याद्वारे प्रमाणपत्र देण्यात आले.


सरपंच दिपकराव तांबे तात्या यांच्या वतीने गावातील सर्व शाळकरी विद्यार्थ्यांना वही-पेन- पुस्तके अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. 

शिवजन्मोत्सवा साठी उपस्थित सर्वांना श्री शिवशंभू कन्स्ट्रक्शन जामखेड चे कदम शेट व शेखर दांडगे शेट यांच्या वतीने नाष्टा व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली.


शिवजन्मोत्सवात गावातील लहानथोरांचा आनंदाने सहभाग, , कार्यक्रमातील सर्वांसाठी पिण्याचे पाणी व नाष्टयाची सोय, शिवजन्मोत्सवांसाठी तयार केलेले व्यासपीठ-डेकोरेशन, शिवाजी महाराजांची आकर्षक मूर्ती ,संध्याकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले.अशा अनेक गोष्टींमुळे यावर्षीचा तांबाराजुरी येथील शिवजन्मोत्सव गावचा आनंदाचा सण झाला आहे. 


शेवटी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष स्वप्निल भैय्या तांबे व इतर सर्व युवा पदाधिकारी सर्वांचेच गावचे सरपंच दिपकराव तांबे तात्या आणि गावकऱ्यांनी धन्यवाद दिले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश तांबे सर, प्रस्ताविक रामदास निंगुळे सर, सर्वांचे आभार हरिदास तांबे सर यांनी मानले. 


 शिवजन्मोत्सव यशस्वी करण्यासाठी अंकुश तांबे सर, मुरलीधर तांबे, इंजि.लक्ष्मण तांबे सर,प्रा.बबन पवार सर, रियाज शेख,ज्ञानेश्वर महाराज तांबे, अक्षय अर्जुन तांबे, स्वप्नील तांबे, रामप्रसाद तांबे, बाळकृष्ण तांबे, नवनाथ तांबे,अनिकेत तांबे,अमोल तांबे, हनुमान तांबे, बिभीषण तांबे,माणिक तांबे,भागवत तांबे, आकाश तांबे,शिवम तांबे, बाळकृष्ण तांबे, अशोक तांबे, दिनेश तांबे,सुदाम, तांबे,सुजीत तांबे, रामप्रसाद तांबे, तुकाराम तांबे, बाबुराव तांबे यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केले. 


एकंदरीतच यावर्षीचा तांबाराजुरी चा शिवजन्मोत्सव खुपच भारी झाला असून तालुक्यांतील घराघरात आणि मनामनात पोहचला आहे



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा