जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिना निमित्त पाटोदा महिला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर

 

जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिना निमित्त पाटोदा महिला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर

➡️ महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी आपली वाट स्वत:च निर्माण करावी - निलाताई पोकळे,वैशाली भोसले 

पाटोदा: गणेश शेवाळे

जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिना निमित्त पाटोदा राष्ट्रवादी महिला कॉग्रेस यांच्या वतीने आरोग्य तपासणी शिबीर पाटोदा शहरात घेण्यात आले . महिला दिन शहरात आणि उच्चभ्रू महिला वर्गातच संपन्न व्हायचा, राष्ट्रवादी महिला टीम राज्यभर सक्रिय झाल्या पासून हे चित्र बदलले आहे.महिला राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी ग्रामीण भागातही तळागाळात जाऊन काम करित असल्यामुळे महिला आपल्या वाटा धुंडाळू लागल्या आहे. शिक्षण आरोग्य ,बचतगट यांच्या माध्यमातुन ग्रामीण भागातील महिलांना मोठ्या प्रमाणात बळ मिळू लागले आहे.आता आत्मनिर्भर होण्यासाठी महिलांनी नव्या वाटा तुडवायला सुरूवात केली असुन ही फार सकारात्मक बाब असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष निलाताई पोकळे व उपाध्यक्ष वैशाली भोसले यांनी बोलताना केले आरोग्य शिबिराला मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवला यावेळी आदर्श शिक्षिका सुरेखाताई खेडकर यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले हे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी यांनी मेहनत घेतली तर पाटोदा आरोग्य विभागाचे डॉ.गोरे, डॉ.भारती व  टीमने सहकार्य केले

टिप्पण्या