खोट्या निवेदनाची चौकशी व्हावी, म्हणून वंचित बहुजन आघाडीचे आठ दिवसा पासून पाटोदा पंचायत समिती समोर आंदोलन सुरूच
➡️ जोपर्यंत चौकशी होणार नाही तोपर्यंत पंचायत समितीच्या दारातून जीव जाईपर्यंत उठणार नाही - राहुल शिरोळे
पाटोदा : शिव जागृती न्यूज
पाटोदा तालुक्यातील
चिखली (नाथ) ग्रामस्थांच्या नावाने खोटे निवेदन देऊन चिखली नाथ येथील ग्रामपंचायत सदस्य राहुल शिरोळे यांनी भ्रष्टाचाराच्या तक्रारी केल्या होत्या त्या तक्रारी त्या निवेदनाद्वारे निकाली काढल्याने सदर निवेदन देणाऱ्याने चिखली नाथ येथील नागरिकांच्या खोट्या सही व अंगठे केले असल्याने यांची चौकशी करून कारवाई करावी म्हणून पाटोदा पंचायत समितीच्या गलथान कारभारा विरोधात वंचित बहुजन आघाडी यांनी काळी गुढी उभारून निषेध चालू केले त्याला आज आठवा दिवस चालू असून आमच्या प्रतिनिधी शी बोलताना आंदोलन कर्ते ग्रामपंचायत सदस्य राहुल शिरोळे बोलले की,जोपर्यंत चौकशी होणार नाही तोपर्यंत पंचायत समितीच्या दारातून उठणार नाही जिव गेला तरी चालेल पण आंदोलन चालूच राहणार .यावेळी जिल्हाउपध्यक्ष गोरख झेंड,तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, शामसुंदर वाघमारे,विठ्ठल पवळ,सुभाष सोनवने, सुनील जावळे,संतीष उबाळे,बाळासाहेब जाधव,खंडु यादव व इतर कार्यक्रते उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा