शिव जागृती न्यूज
नाशिक येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत बीड संघाने प्रथमच सहभाग घेतला. यात संपूर्ण राज्यातून 16 संघ सहभागी झाले होते.गेल्या तीन महिन्यांपासून विविध तालुक्यातून स्थानिक स्पर्धेतून निवडक खेळाडू निवडून बीड संघ तयार करण्यात आला. हलाखीच्या परिस्थिती असलेल्या खेळाडूंना साबीर कन्स्ट्रक्शन चे शहानवाज सय्यद, आनंद हार्डवेअर अजिनाथ बोरा, एस वैद्य ग्रुप रोमन वैद्य यांनी प्रायोजकत्व दिले व सामाजिक बांधिलकी जपली. 8 एप्रिल पासून सुरू झालेल्या स्पर्धेत ग्रुप ब मध्ये पहिल्या फेरीत सामना अमरावती संघाशी ,दुसरा सामना नाशिक सिटी संघाशी व तिसरा भंडारा संघाशी झाला. यात मोठ्या फरकाने बीड संघाने विजय मिळावला.
क्वार्टर फायनलमध्ये बीड संघाची गाठ नाशिक ग्रामीण संघाशी पडली. नॅशनल व इंटरनॅशनल स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंच्या संघाला बीड ने सहज मात दिली. सेमी फायनल मध्ये रत्नागिरी या 4 इंटरनॅशनल खेळाडूंच्या संघा बरोबर अटीतटी च्या सामन्यात बीड संघाने 14 धावांनी विजय मिळावला.
अंतिम फेरीत क्रिकेट ची पांढरी असलेल्या संघाशी लढत झाली. यात सुरुवातील खेळताना बीड संघाने 8 षटकात 60 धावा केल्या. मुंबई संघाला बीड संघाने तुल्यबळ लढत दिली. शेवट च्या बॉल वर 3 धावांची गरज असताना फुल्ल टॉस बॉल वर षटकार मारून मुंबई संघ विजयी झाला.
बीड संघाने फायनल हरूनही सर्वांची मने जिंकली. व उपविजेता पदाच्या ट्रॉफी वर आपले नाव कोरले. या संघात व्यवस्थापक सुशील तांबे, खेळाडू जालिंदर राजगुरू, वैजीनाथ नागरगोजे,सागर सानप, आदित्य जाधव, गजेंद्र गुंडले,गणेश पवार , संजय गिते,पृथ्वी पाटील आकाश मोहोळकर,केदारनाथ येवले अंमन पठाण,गणेश मोहिते, अभिमान सानप पठाण, या खेळाडूचा सामावेश होता. मालिका वीर व 4 सामन्यांचा मेन ऑफ द मॅच पुरस्काराने आकाश मोहोलकर यांना सन्मानित करण्यात आले.
बक्षीस वितरणाला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन च्या सेक्रेटरी मीनाक्षी गिरी , टेक्निकल डायरेक्टर स्वप्नील ठोमरे यांच्या हस्ते करण्यात आले .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा