जय भवानी कॉलेज मध्ये पृथ्वीराजे पंडित यांच्या शुभहस्ते कबड्डीच्या सराव शिबिराचे उद्घाटन


 

पाटोदा : गणेश शेवाळे


बीड जिल्हा कबड्डी असोसिएशन आयोजित कबड्डीच्या सराव शिबिराचे आयोजन

पाटोदा तालुक्यातील जय भवानी कॉलेज मध्ये करण्यात आले, या कबड्डी सराव शिबिराचे उद्घाटन गुरुवारी दिनांक 21 एप्रिल रोजी युवानेते पृथ्वीराजे पंडित यांच्या शुभहस्ते तर प्रमुख पाहुणे म्हणून दिलीपराव जाधव, मधुकर गर्जे,यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते जय भवानी कॉलेज मध्ये संपन्न झाले.


यावेळी बोलताना पुथ्वीराजे पंडित म्हणाले खेळाडूने खेळ भावनेने खेळ खेळावा. जे खेळाडू पुढील स्पर्धेसाठी निवडली जातील त्यांना शुभेच्छा व जे खेळाडू निवडले जाणार नाहीत त्यांनी ही खचून न जाता पुढे चांगला सराव करून एक आदर्श खेळाडू होऊन आपल्या तालुक्याचे जिल्हाचे नाव मोठे करावे असे आवाहन केले.


 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जय भवानी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर विश्वास कदम सर यांनी केले तर आलेल्या सर्व खेळाडूचे व मान्यवरांचे आभार जय भवानी कॉलेज पाटोदा यांच्या वतीने करण्यात आले.

टिप्पण्या