माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवारसाहेब यांच्या घरावर झालेल्या दगडफेकीच्या घटने मागील सुत्रधाराचा शोध घेऊन कारवाई करावी
पाटोदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन
शिव जागृती न्यूज : गणेश शेवाळे
कर्मचाऱ्याच्या आंदोलनाच्या आडून संविधानाच्या आणि लोकशाहीच्या गप्पा करणारानी असंविधानिक पद्धतीने कायदा हातात घेऊन माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवारसाहेब यांच्या घरावर दगडफेक केली.वास्तविक पवारसाहेब हे स्वतः सरकार मध्ये नाहीत किंवा न्याययंत्रणेमध्ये ही नाहीत , तेव्हा घटनेला व लोकशाहीला शिरसावंद्य मानणारे पवार साहेबांच्या घरावर असा निंदनीय हल्ला कसा करू शकतात ? यामागे निश्चितच काहीतरी षडयंत्र असू शकते , समाजामध्ये तेढ निर्माण करून अस्थिरता निर्माण करण्याचा कट सुद्ध असू शकतो , कारण पवार साहेबांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग आहे, गेल्या दोन - अडीच वर्षापासून राज्यामध्ये कोव्हीड 19 सारख्या महामारीने संपूर्णपणे आर्थिक चक्र कोलमडले असताना सुद्धा महाविकासआघाडी सरकार लोकांच्या आरोग्या संदर्भात प्राधान्यक्रम देऊन या नैसर्गिक दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचा व आर्थिक घडी बसविण्याचा प्रयत्न करत आहे.
याउलट काही दुष्ट शक्ती कि ज्यांना मुळात लोकशाही मान्यच नाही , अशा अदृश्य शक्ती महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी संपाच्या माध्यमातून व समाज कंटकाच्या माध्यमातून एस.टी चा संप , विद्युत कर्मचाऱ्यांचा संप , महसूल कर्मचाऱ्यांचा संप या माध्यमातून महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत आहे का ? हे सुद्धा तपासणे गरजेचे आहे करिता वरील घडलेल्या निंदनीय घटनेचा निषेध व्यक्त करून पाटोदा उपविभागीय अधिकारी कार्यालय पाटोदा यांना राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तालुका पाटोदा सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने दंडाला काळ्या फिती बांधून निवेदन देण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा