पाटोदा ग्रामीण रुग्णालयात भव्य आरोग्य शिबीर संपन्न

 

➡️ आरोग्याच्या मोफत सेवेची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवून जनजागृती झाली पाहिजे व लवकरच ग्रामीण रुग्णालयातील पाणी प्रश्न मार्गी लावू - नगरसेवक सय्यद आबुशेठ 

पाटोदा : गणेश शेवाळे

अमृत महोत्सव निमित्त पाटोदा ग्रामीण रुग्णालयात आरोग्य शिबीराचे आयोजन गुरूवार दिनांक 21 एप्रिल रोजी करण्यात आले होते. शिबीरामध्ये तालुक्यातील विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या मणक्याचे आजार ,संधीवात , हाडाचा ठिसूळपणा , मान ,पाठ , गुडघेदुखी , यावर रोगनिदान करून योग्य ते उपचार केले गेले तसेच कान ,नाक , घसा , अपेंडिक्स, हार्निया , शरीरावरील गाठी व इतर छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या हे शिबीर यशस्वी करण्यासाठी सर्व आरोग्य अधिकारी, कर्मचारी,डॉक्टर,नर्स,आशा सेविका यांनी हे शिबीर यशस्वी करण्यासाठी मोठे कष्ट घेतले यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना नगरसेवक सय्यद आबुशेठ म्हटले की, गोर - गरीब सर्व सामान्य कुटुंबाना पैश्याअभावी आॅपरेशन व विविध आजार असतील, तर खुप अडचणी निर्माण होतात. यामुळे महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची माहिती तळागाळातील ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये पोहचत राहावी,म्हणून गावपातळीवर कॅम्प घेऊन शासनाच्या आरोग्य योजनांची जनजागृती करावी असे आवाहन सय्यद आबुशेठ यांनी केले.


 पाटोदा ग्रामीण रुग्णालयातील पाणी प्रश्न मार्गी लावु असेही आश्वासन नगरसेवक सय्यद आबुशेठ यांनी दिले. 

पाटोदा ग्रामीण रुग्णालयातील आयोजित आरोग्य शिबिर मध्ये विविध आजार व शासकीय आरोग्य योजनांच्या माहितीचे फलक लावून जनजागृती करण्यात आली व स्टाॅल ही लावण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात अंडवृद्धि,हर्निया,अपेंडिक्स, लहान मुलांमधील टंग - टाय, जिभेवरील शस्त्रक्रिया,शरीरातील सर्व प्रकारच्या गाठी शस्त्रक्रिया व दंत चिकित्सा आदी आजारावरील शस्त्र क्रिया व औषध उपचार मोफत करण्यात आले गर्भाशय व स्तनाच्या गाठी, रक्तदाब, मधूमेह, असांसर्गिक आजार, ईसीजी, एक्स-रे, सोनोग्राफी, रक्त व लघवी तपासणी,स्रीरोग तज्ञ, शस्त्रक्रिया तज्ञ, दंतरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, कान नाक घसा तज्ञ, आयुर्वेदिक तज्ञ, जनरल फिजिशियन या शिबिरात रुग्णांची मोफत तपासणी उपचार करण्यात आले होते या शिबीराचा मोठ्या संख्येने रुग्णानी लाभ घेतला.

टिप्पण्या