वाघाचावाडा साठवन तलावाचे काम लवकरच होणार सुरु, सर्व तांत्रिक अडचणी दूर



  

मुरली तांबे यांनी उपस्थित केला होता प्रश्न

आष्टी: शिव जागृती न्यूज


 बीड जिल्ह्यातील आष्टी येथे राष्ट्रवादी परिवार संवाद च्या पर्व सहावे मध्ये ना. जयंत पाटील हे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आले असता त्यांनी कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. राष्ट्रवादी परिवार संवाद  च्या निमित्ताने राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील साहेब यांनी आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदार संघातील सर्व कार्यकर्त्यांना संवाद साधण्याची संधी दिली.


यावेळी पाटोदा तालुक्यातील तांबा राजुरी येथील राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कोषाध्यक्ष मुरली तांबे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब यांना पाटोदा तालुक्यातील वाघाचा वाडा तलावा बाबतीत प्रश्न विचारले या तलावाची सद्यस्थिती काय आहे? असे विचारण्यात आले, तर त्यावर उत्तर देताना मा. ना. जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले की, या तलावासाठी पाणी उपलब्ध प्रमाणपत्र भेटत नव्हते ही तांत्रिक अडचण होती पण आता पाणी उपलब्ध प्रमाणपत्र भेटले आहे,त्यासाठी आ. बाळासाहेब आजबे यांनी प्रयत्न केले व आता या प्रोजेक्ट मधील सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून तलावाची प्रशासकीय होण्याची प्रोसेस चालू आहे लवकरच प्रशासकीय होऊन,कामाला सुरुवात होईल अशी माहिती त्यांनी दिली.


पाटोदा तालुक्यातील वाघाचा वाडा तलाव हा प्रोजेक्ट तांबाराजुरी उंबरविहिरा वडझरी वाघाचा वाडा आदी गावातील लोकांना संजीवनी देणारा होईल, या तलावातून शेकडो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल व सर्व शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. या तलावामुळे या परिसरातील संपूर्ण क्षेत्र बागायती होईल. या क्षेत्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल असे मत राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कोषाध्यक्ष मुरली तांबे यांनी व्यक्त केले. यावेळी खंडू नेमाने, शिवाजी नेमाने, शेंडकर मुकादम, पव्हणे मुकादम, लक्ष्मण गव्हाणे,अनिकेत तांबे, राम तांबे, पत्रकार बबन पवार सर इत्यादी उपस्थित होते.


राष्ट्रवादी परिवार संवाद या कार्यक्रमाला राज्याचे जलसंपदा मंत्री मा. ना. जयंत पाटीलसाहेब,आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बाळासाहेब आजबे ,राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख,माजी आमदार साहेबराव दरेकर नाना,जिल्हा अध्यक्ष राजेश्वर चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस युवक बीड जिल्हा अध्यक्ष जयसिंह सोळंके, जिल्हा उपाध्यक्ष दीपक दादा घुमरे,जिल्हा उपाध्यक्ष सतीश आबा शिंदे, रेखा ताई फड, तालुका अध्यक्ष शिवभूषण जाधव, राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष नीलाताई पोकळे,राष्ट्रवादी तालुकाउपाध्यक्ष सोनाली येवले,  यांच्या सह सर्व तालुकाध्यक्ष सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या