पोलीस भरती 15 जुनपासुन सुरु


 


मुंबई : शिव जागृती न्यूज़


राज्यात लवकरच तब्बल 7 हजार पदांची पोलीस भरती होणार असून, भरती प्रक्रियाच्या तारखेबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी तारीख जाहीर केली आहे. जूनच्या 15 तारखेपासून पोलीस भरतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. इतकंच काय तर यानंतर सुद्धा राज्य मंत्रिमंडळासमोर 15 हजार पदे भरण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे असंही वळसे पाटील म्हणालेत. पोलीस यंत्रणेवरील वाढता ताण लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलेला आहे.


गेल्या दोन वर्षा कोरोनामुळे भरती प्रक्रिया ही मंदावली होती. कोरोनाचा कहर वाढल्याने अनेकदा पोलीस भरतीच्या तारखा पुढेही ढकलण्यात आल्या होत्या. तसेच कोरोनात अनेक कंपन्या बंद पडल्या. अनेक उद्योगधंदे देशोधडीला लागल्याने अनेक तरुणांवर बेरोजगारीची वेळ आलीय. हाताला काम नसणाऱ्या तरुणांची सख्या राज्यात सध्या मोठी आहे. त्यामुळे अनेकांनी पोलीस भरतीची तयारी सुरू केली होती. त्या तरुणांना आता ही बातमी सुखावणारी आहे. त्यांचे भरती होण्याच स्वप्न सत्यात उतरण्यास या भरतीने मोठी मदत होणार आहे.

राज्यात 50,000 पोलीस पदे रिक्त आहेत. साडेपाच हजार उमेदवारांची भरती पूर्ण झालीये.सात हजार पदांची भरती काढली गेलीये, 15 हजार पदे अधिक भरण्यासाठी प्रस्ताव देण्यात आलाय आणि भरती प्रक्रिया 15 जून पासून सुरु करण्यात येणार आहे. गृह विभागाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या पोलीस भरतीचा मार्ग आखेर मोकळा झाल्याने युवकांना हा मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाकाळात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे अनेकजण नोकरीच्या शोधात आहेत. तसेच पोलीस भरती होण्यासाठी अनेकजण गेल्या काही महिन्यांपासून मैदानात घाम गाळत आहेत. त्यांना त्यांच्या घामाचं सोनं करण्याची संधी देणारी ही भरती असणार आहे. विविध कारणांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात पोलीस भरती ही झाली नव्हती. त्यामुळे अनेकांना या संधीची प्रतीक्षा लागली होती. ती प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे.

टिप्पण्या