पाटोदा येथे उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी द्यावी, म्हणून पत्रकारांचे आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांना निवेदन


 

पाटोदा : शिव जागृती न्यूज

पाटोदा शहर व परिसराच्या वाढत्या विस्तारामुळे व वाढत्या लोकसंख्येमुळे या ठिकाणी आपत्कालीन आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून सध्याच्या परिस्थितीत दर्जेदार व पुरेशा आरोग्य सुविधा तसेच सर्व प्रकारचे तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध असण्याची नितांत गरज आहे यासाठी पाटोदा येथे उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी द्यावी या मागणीचे निवेदन पाटोदा येथील पत्रकारांच्या वतीने राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना दिले या वेळी मंत्री टोपे यांनीही पत्रकाराच्या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरच पुढील कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले सोमवार दि २ रोजी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे पाटोदा परीसरातील चुंभळी फाटा या ठिकाणी आले असता पाटोदा येथील पत्रकार संघाचे अध्यक्ष सोमीनाथ कोल्हे,जेब्ठ पत्रकार पोपट राऊत,पोपट कोल्हे, महेश बेदरे,अजीज शेख, गणेश शेवाळे ,राहुल सोनवणे आदींच्या शिष्टमंडळाने टोपे यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले, यामध्ये म्हटले आहे की,पाटोदा तालुका हा निजामकालीन तालुका असून बीड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे या ठिकाणी काही वर्षांपूर्वी पत्रकार व नागरिकांनी केलेले आंदोलन व मोठ्या संघर्षा नंतर ग्रामीण रुग्णालय सुरू झाले असून यासाठी पाटोदा पत्रकार संघाच्या वतीने त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका देखील दाखल करण्यात आली होती. सध्या पाटोदा शहर व परिसरातून पैठण पंढरपूर सह दोन ते तीन राष्ट्रीय महामार्ग जात आहेत त्यामुळे मागील काही काळात या भागात अपघातांचे प्रमाण वाढत आहे त्याच सोबत शहर व परिसराच्या वाढत्या विस्तारामुळे व वाढत्या लोकसंख्येमुळे या ठिकाणी आपत्कालीन आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून सध्याच्या परिस्थितीत दर्जेदार व पुरेशा आरोग्य सुविधा तसेच सर्व प्रकारचे तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध असण्याची नितांत गरज आहे यासाठी पाटोदा येथे उपजिल्हा रुग्णालय असणे आवश्यक आहे.

तरी मा.साहेब आपण आमच्या मागणीचा सकारात्मक विचार करून पाटोदा येथे उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी द्यावी अशी मागणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली .

टिप्पण्या