छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त मिरवणुकीची परवानगी नाकारल्याने शिवशंभू प्रेमी कडून प्रशासनाचा जाहीर निषेध


पाटोदा : शिव जागृती न्यूज

धर्मवीर छत्रपती  संभाजी महाराज जयंती अवघ्या काही दिवसावर आली असताना शिवशंभू प्रेमी बांधवानी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीची जोरदार तयारी करण्यात आली असून पाटोदा शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असल्यामुळे त्यासाठी लागणारी परवानगी म्हणून छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती परवानगी घेण्यासाठी पाटोदा पोलीस स्टेशन मध्ये गेले असता,त्यांना पाटोदा पोलीस प्रशासनाने मिरवणुकीसाठी परवानगी नाकारल्यामुळे तमाम शिवशंभू प्रेमी भक्तांच्या भावना दुखावल्या असल्याने संतप्त शिवशंभू प्रेमीने

उपविभागीय कार्यालयात ठैय्या आंदोलन करत पाटोदा प्रशासनाचा व महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध करत उद्या पर्यंत मिरवणुकीला परवानगी दिली नाही,तर उद्या पाटोदा बंदची हाक पाटोदा तालुक्यातील तमाम शिवशंभू प्रेमी बांधवानी दिली आहे.

टिप्पण्या