पाटोदा- शिव जागृती न्यूज
गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारी मुळे कोणतेही कार्यक्रम आयोजित करणे शक्य झाले नाही.त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करता आली नाही.महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांनी सहभागी होऊन अहिल्याबाई होळकर यांची जयंती घराघरात वाड्या-वस्त्यात गावागावात मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे आवाहन युवा नेते प्रणव जावळे यांनी केली
३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात येते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा इतिहास हा संपूर्ण जगात सुप्रसिद्ध आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची संपूर्ण जीवन चरित्र प्रेरणादायी आहे आपल्या राज्यात विधवांना दत्तकपुत्र घेण्याचा अधिकार देणे तसेच स्त्रियांचे स्वतंत्र सैनिक प्रशिक्षण कारणे व स्त्रियांची बटालियनची स्थापना करणे महिला विणकरांना प्रोत्साहन देणे आणि एका अर्थाने वस्त्रोद्योग व्यवसायाचा पाया घालने या सारखी कामे त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी केली.
राजकारण,समाजकारण, अर्थकारण, विकासकारण आदी क्षेत्रात त्यांनी ठसा उमटविला त्यामुळे त्यांनी केलेल्या कार्याची कृतज्ञता म्हणून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती घराघरात उत्साहात साजरी करण्याचे आवाहन युवा नेते प्रणव जावळे यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा