पाटोदा : शिव जागृती न्यूज
लोकनेते माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख हे कायम शेतकरी,सर्व सामान्यांच्या हिताचा विचार करत असल्याने महाराष्ट्र सरकार ऊर्जा विभागाने विलासराव देशमुख अभय योजना सुरू केली असून हा निर्णय सर्वसामान्यांना दिलासा देणारा आहे. 'विलासराव देशमुख अभय योजना' ही थकीत वीजबिल आणि कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांसाठी असून या योजने अंतर्गत एकरकमी थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना 100% व्याज व विलंब शुल्क माफी देण्यात येणार आहे. महावितरणच्या ग्राहकांना ह्या योजनेचा खुप मोठा फायदा होणार आहे.
1मार्च 2022 ते 31 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये ग्राहकांनी याचा लाभ घ्या.तालुक्यातील ग्राहकांनी या योजनेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी पाटोदा महावितरण कार्यालयास संपर्क साधावा असे आवाहन पाटोदा महावितरण उपविभागीय कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता विजय भारंबे यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा