सावरगावातील शेतकऱ्यांनी केला लोकवर्गणीतून रस्ता

 


पाटोदा : शिव जागृती न्यूज


 सावरगाव सोने येथील शेतकरी हानुमान मंदिर ते नागरगोजे वस्ती रस्त्यासाठी शेतकऱ्यांनी आनेक सरकारी कार्यालयात अनेक वेळा चक्करा मारून देखील रस्त्याला निधी मिळाना प्रशासन दखल न घेतल्यामुळे अनेक रस्ते इतिहास जमा होत आहेत,तरी काही रस्त्यांसाठी तालुक्यात मारामारी होईपर्यंत परिस्थीती निर्माण होते. तरीही शासन दखल घेत नसल्याने सोने सावरगाव येधील शेतकऱ्यांनी स्व:त पुढाकार घेत शेतकऱ्यांनी एकरी,तसेच ज्याला सुचेल,झेपेल अशा पद्धतीने कोणी पाच हजार,सहा हजार, दोन हजार याप्रमाणे वर्गणी करून स्वखर्चातून हानुमान मंदिर ते नागरगोजे वस्ती रस्त्या तयार केला येथील सर्व शेतकऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यासाठी तालुका प्रशासनाचे,तसेच जिल्हा प्रशासनाचे, पुढार्याचे उंबरठे ओलांडून शेतकरी हतबल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारणाचे घोडे मिरवणारे अनेक लोकप्रतिनिधी बघितले, पण प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कुठलाही लोकप्रतिनिधी आजपर्यंत सापडला नाही.अधिकारी फिरकायला तयार नाहीत. एक महिन्याच्या अंतरावर पावसाळा आला आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या शेताची पेरणीसाठी तयारी करावी लागत आहे आणि आत्ताच्या यंत्रसामुग्री युगामध्ये यंत्राच्या साह्याने सर्व शेती करावी लागते, पण रस्ता नसेल, तर शेती करायची कशी ? म्हणून अनेक वर्षांपासून शासनदरबारी पाठपुरावा सुरू आहे,मात्र पावसाळा तोंडावर आला तरी कोणतीच हालचाल होत नसल्याने सावरगाव सोने येथील शेतकरी शामसुंदर उत्तमराव नागरगोजे, नानासाहेब लक्ष्मण नागरगोजे,दिनकर मारोती बांगर,रामहारी वामन वायबसे (महाराज),

नामदेव निवृत्ती नागरगोजे, नारायण रामराव नागरगोजे, बाबासाहेब ज्ञानोबा नागरगोजे,लक्ष्मण मारोती बांगर,परमेश्वर त्रिबंक बांगर ,बारीकराव मारोतीां बांगर ,सुरेश रावसाहेब दगडखैर,सुखदेव ज्ञानोबा बांगर,लक्ष्मण मरोती बांगर,जनार्दन मारोती नागरगोजे,दिलीप दशरथ नागरगोजे,रामकिसन रघुनाथ राख,तुकाराम अंकुश नागरगोजे ह्या शेतकऱ्यांनी लोकवर्गनीतुन रस्ता तयार केला आहे.

टिप्पण्या