शंभरावर बचतगटांना केले अर्थसहाय्य; व्यवसायाकांनाही मदतीचा हात
बीड ः प्रतिनिधी
महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, छोट्या व्यवसायिकांना कर्जाची उपलब्धता, कर्जदारांसाठी अपघात विमा योजनांच्या माध्यमातून तेजस अर्बनने जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. तेजस अर्बनने आतापर्यंत शंभरावर बचतगटांना कर्जवाटप करुन महिला आर्थिक सक्षमीकरणात पुढाकार घेतला आहे. या अंतर्गत बुधवारी बीड शहरातील गयानगर येथील सावित्रीबाई महिला बचतगटास दोन लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले.
जिल्हापरिषद सदस्य तथा संस्थेचे अध्यक्ष अॅड.प्रकाश कवठेकर यांच्या नेतृत्वाखाली तेजस अर्बनची तेजस्वी वाटचाल सुरु आहे. सुरेशअण्णा अपघात विमा योजना, वीजबील भरणा केंद्र, सोनेताण कर्ज, वाहन तारण कर्ज, कन्यादान योजनेच्या माध्यमातून कर्जवाटप केले जात आहे. कर्जवाटप करतांना छोटे व्यवसायिक, महिला बचतगट यांना प्राधान्य देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तेजस अर्बनने आतापर्यंत शंभरावर महिला बचतगटांना कर्जवाटप केले असून या माध्यमातून बचतगटाच्या सदस्य महिलांनी विविध गृहउद्योग सुरु केले आहेत. या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत.
बुधवारी शहरातील गयानगर भागातील सावित्रीबाई महिला बचत गटाला दोन लाख रुपयांच्या खेळत्या भांडवलाचा धनादेश संस्थेचे अध्यक्ष अॅड. प्रकाश दादा कवठेकर, उपकार्यकारी अधिकारी सचिन घीगे, बचत गट समन्वयक सौ पांचाळ मॅडम, मार्केटिंग अधिकारी सौ.खेडकर मॅडम यांच्या हस्ते बचत गटाच्या अध्यक्ष रोहिणी शिवाजी आगलावे व सचिव कविता विजय बनसोडे व सदस्य यांना देण्यात आला.
*पंधरा कर्जधारकांना अपघात विमा योजनेचा लाभ*
तेजस अर्बनच्या कर्जदारांसाठी सुरेशअण्णा अपघात विमा योजना राबविण्यात येते. या योजनेतून आतापर्यंत 15 जणांना 1 ते 4 लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेमुळे कर्जधारकांच्या कुटूंबाला आर्थिक मदत मिळू शकली आहे.
*महिला बचतगट, व्यवसायिकांसाठी सदैव तत्परःअॅड.कवठेकर*
सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतांना सर्वसामान्यांना येणार्या आर्थिक अडचणी जवळून पाहिल्या. त्या दूर करण्यासाठी तेजस अर्बनची सुरुवात केली. सध्या बीडसह विविध ठिकाणच्या शाखांच्या माध्यमातून तरुण व्यवसायिक, महिला बचतगट यांना कर्जवाटपात प्राधान्य देत आहोत. याबरोबरच सोनेतारण, वाहनतारण कर्ज सुविधाही उपलब्ध आहे. आगामी काळातही महिला बचतगटांसाठी संस्थेच्या वतीने कर्जवाटप केले जाणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अॅड.प्रकाशदादा कवठेकर यांनी म्हटले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा