पाटोदा : शिव जागृती न्यूज
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची शहर व जिल्हा आढावा बैठक राष्ट्रवादी भवन येथे पार पडली या बैठकीला सुरूवात करण्याअगोदर बीड विधानसभेचे लोकप्रिय आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या मातोश्री तथा जिल्हा परिषद सदस्या स्व.रेखाताई रविंद्र क्षीरसागर यांना श्रद्धांजली अर्पण केली.व बैठकीस सुरूवात झाली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बीड जिल्हा युवती उपाध्यक्ष पदी डोंगरकिंन्ही येथील धडाडीच्या कार्यकर्त्या सौ.सोनालीताई येवले यांची निवड करण्यात आली या निवडीचे पत्र देखील सोनाली ताई येवले यांना देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती बीड जिल्हा उपाध्यक्ष पदी सोनाली येवले यांची निवड करण्यात आली यावेळी बीड जिल्हा युवती अध्यक्ष ललिता श्रीराम शेजाळ ॲड. जेबा अब्दुल कादिर शेख ,माजी खासदार श्री.जयसिंगराव गायकवाड पाटील, जिल्हाध्यक्ष अॅड.राजेश्वर चव्हाण, ओबीसी प्रदेश सरचिटणीस ईश्वर मुंडे सर,मराठवाडा महिला समन्वयक अड. प्रज्ञाताई खोसरे, निंबाळकर ताई, युवक प्रदेश सरचिटणीस निककंठ वडमारे,राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्षा विद्या जाधव (चौरे) सेवादल जिल्हाध्यक्ष पाशा भाई व सर्व राष्ट्रवादीचे शहर तालुका जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा