तळेपिंपळगाव येथील बोगस विहिरींची चौकशी करून कारवाई करा- आकाश चौरे




चौकशी न करणाऱ्या बिडीओ व ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करा - आकाश चौरे



पाटोदा : शिव जागृती न्यूज


पाटोदा तालुक्यातील तळे -पिंपळगाव येथील विहिरीचे कामे बेकायदेशीर रित्या झालेले असून त्यांची संपूर्ण पने चौकशी करण्यात यावी. अशी मागणी निवेदनाद्वारे महिन्यापुर्वी सामाजिक कार्यकर्ते आकाश चौरे यांनी केली होती.तक्रारी मध्ये शासकीय योजने अंतर्गत मधून मिळालेल्या काही विहिरी वीस फुट तर काही विहिरी तीस फुट खोदलेल्या आहेत. यांची पाहणी न करता त्यांची संपूर्ण रक्कम संबंधित आधिकार्याने लाभार्थ्यांना दिली असल्यामुळे महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक मग्रारो 2012/प्र.क्र.24/रोहयो-10अ. दि.27.01.2012 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा 2005 अंतर्गत अपूर्ण विहिरीची संपूर्णपणे रक्कम बेकायदेशीररित्या 2012 पासून 2021 पर्यंत उचललेली गेली आहे. तसेच शासनाच्या पत्राप्रमाणे काम पूर्ण झाल्यावर कामाचे फलक लावणे बंधनकारक असून तळे-पिंपळगाव मध्ये योजनेप्रमाणे कामाचे फलक लावलेले नाहीत व नियमाप्रमाणे काम चालू असताना मजुरांचे फोटो (MIS) टाकण्यात आलेले असून ते दुसर्याच लाभार्थ्याच्या विहिरीचे फोटो दाखवण्यात आलेले आहे. काही कामे इस्टीमेट पेक्षा कमी झालेले आहेत.

अशा संबंधित सर्व विहिरीची प्राथमिक चौकशी करून संबंधित अधिकारी,कर्मचारी, रोजगार सेवक यांच्यावर योग्य ती कार्यवाही ची मागणी करून ही पाटोदा पंचायत समितीने दखल घेतली नसल्याने गट विकास अधिकारी व ग्रामसेवक हे तक्रार करून देखील का चौकशी करत नाही ह्या भ्रष्टाचाराला अधिकार्याचा पाठिंबा आहे का ? या गंभीर प्रकारची वरिष्ठ आधिकार्याने चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आकाश चौरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली असून लवकरच गटविकास अधिकारी व ग्रामसेवक,रोजगार सेवक यांच्यावर कारवाई झाली नाही तर लोकशाही पद्धतीने बीड जिल्हा परिषद कार्यालया बाहेर लोकशाही पद्धतीने आंदोलन करू असा इशाराही सामाजिक कार्यकर्ते आकाश चौरे यांनी दिला आहे.
 

टिप्पण्या