पाटोदा: शिव जागृती न्यूज
पाटोदा तालुक्याचे राजकारण हालवणार्या गावा पैकी एक गाव म्हणजे तळेपिंपळगाव!.अशा महत्त्वाचा गावात तलाठी येत नसल्यामुळे गोरगरीब जनतेला व शेतकर्यांना ह्याचा नाहक ञास सहन करावा लागत असून अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे तर तलाठी तालुका ठिकाणावरून कारभार हाकत असून गावातील कारभार पाहण्यासाठी तलाठ्यानी अशासकीय लोकांची नेमणूक केली आहे हा प्रकार आतिशय गंभीर असून तालुक्यातील महत्त्वाचा गावात अशी परिस्थिती पहायला मिळते तर इतर ठिकाणी कशी परिस्थिती असेल यामुळे महसुल विभागाचा कारभार वर जनतेचा विश्वास राहिला नसल्यामुळे पाटोदा तहसीलदार साहेबांनी तळेपिंपळगाव येथील तलाठी सज्जावर तलाठी का येत नाही? ह्या गंभीर प्रकाराची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांना सज्जावर राहण्याचे आदेश द्यावे व गावातील सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करावी अशी मागणी तळेपिंपळगाव येथील उपसरपंच इश्वर चौरे यांनी केली असून कारवाई झाली नाहीतर लोकशाही पद्धतीने आंदोलन करू असा इशाराही उपसरपंच ईश्वर चौरे यांनी दिला आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा