माजी सभापती संदीप जाधव यांनी गरजवंत मुलाला सायकल देऊन मुलीचा वाढदिवस साजरा
पाटोदा : शिव जागृती न्यूज
पाटोदा तालुक्यात सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असलेले सर्व समाजाच्या सुख-दुःखात हाकेला धावून जाणारे पाटोदा नगरपंचायतचे मा.सभापती संदीप जाधव यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवसा निमित्त पारेश्वर विद्यालय पारनेर येथील राहुल दहिफळे या मुलाला सायकलची अत्यंत गरज होती हा मुलगा कुटेवाडी ते पारनेर रोज शाळेत पायी जात होता. याची माहिती माणुसकीची भिंतचे दत्ता देशमाने यांनी मा. सभापती संदीप जाधव यांना सांगितली असता जाधव यांनी स्वतःच्या मुलाची सायकल त्या गरजूवंत मुलाला जास्त गरज असल्यामुळे त्यांनी स्वतःची सायकल त्या मुलास देऊन आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा करून समाजात एक चांगला संदेश आपल्या मुलीच्या वाढदिवसा निमित्त मा.सभापती संदीप जाधव यांनी दिला. याबद्दल माजी सभापती संदीप जाधव यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा