पाटोद्यात लगन टीम च्या कलाकारांची भव्य रॅली!

 





लगन टीम वर सर्वांनीच प्रेम,सहकार्य केले,मिरवणुकीत सहभाग घ्यावा - किशोर काकडे, सय्यद मुस्तफा

पाटोदा: शिव जागृती न्यूज

पाटोदा तालुक्यातील युवकांनी एकत्रित येऊन ग्रामीण भागातील प्रेम यावर आधारित "लगन" हा चित्रपट निर्माण केला आहे.त्याला आतापर्यंत सर्वच प्रेक्षकांनी हितचिंतकांनी पोस्टर व टेझर ला उदंड प्रतिसाद दिला असून सहा मे रोजी प्रदर्शित होणार आहे त्यानिमित्ताने डोंगर किनी येथून दि.4 मे ला दुपारी साडेतीन वाजता लगन टीमच्या सर्व कलाकारांची भव्यदिव्य रॅली निघणार आहे. 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक पाटोदा येथे अभिवादन करून वैद्यकिनी मार्गे 5 वाजता मांजरसुंबा येथे बार्शी नाका ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा बीड नंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रॅलीचा समारोप होणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन किशोर काकडे व सय्यद मुस्तफा यांनी केले.

"तुमचं ना रडु लयच जवळ असतं, अन् तेच आमचं जीव घेत" या टॅगलाईन ला शोभेल असा लगन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला 6 मे रोजी येत असून अपेक्षेपेक्षा जास्त प्रमोशन त्यांनी महाराष्ट्रभर केले आहे सर्व टीमच्या कष्टाला सहा मे ला नक्कीच फळ मिळेल यात शंका नाही परंतु अधिक उत्साही होऊन नागरिकांनी चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये येण्यासाठी सर्व लगन टीमचे कलाकार निर्माते एकत्रित येऊन भव्यदिव्य रॅली  अशी काढणार आहेत या रॅलीमध्ये आपण सर्वांनी सहभागी होऊन चित्रपट पाहण्यासाठी यावे असे आव्हान लगन टीमचे किशोर काकडे व सय्यद मुस्तफा यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

प्रेमाचा खरा अर्थ लगन चित्रपटातून मिळणार

ग्रामीण भागातील युवकांनी एकत्रित येऊन प्रेमाचा खरा अर्थ सांगत नाजूक फुल जेवढे बोचरे काटे अर्थातच प्रेम करणं सोपं पण अतिशय कठीण प्रेमाची वाट बिकट असली तरी धरलेली साथ शेवटपर्यंत निभवायला लावणारी हिमतीची गोष्ट घेऊन लगन चित्रपट आपल्या भेटीसाठी येत आहे धमाकेदार प्रमोशन नंतर भव्य दिव्य रॅली 4 मे रोजी सर्व लगन टीमच्या कलाकारांची निघणार आहे अशी माहिती आमच्या किशोर काकडे यांच्याकडून देण्यात आली आहे.

बीडचा सुजित चौरे आणि श्‍वेता काळे चित्रपटाचे मुख्य आकर्षन!

मराठी चित्रपट सृष्टी मध्ये युवकांना सध्या आपल्या कलेच्या जोरावर संधी मिळू लागली आहे.आता नव्याने बीड जिल्ह्यातील युवकांनी एकत्रित येऊन लगन चित्रपट निर्माण केला,असून त्यात बीडचा सुजित चौरे हिरोच्या भूमिकेत असून श्‍वेता काळे हिरॉईनच्या भूमिकेत आहे.या नवीन जोडीने महाराष्ट्रातील तरुणाईला आकर्षित केले असून त्यांच्या प्रमोशनला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. येणाऱ्या 6 तारखेला हा लगन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

टिप्पण्या