पाटोदा तालुक्यात एका जि प गटाची वाढ


 

जिल्हा परिषद गट गण रचना प्रारूप आराखडा जाहीर

 

बीड :शिव जागृती न्यूज


जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना आज (दि.2) रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, प्रभाग रचनेवर 2 ते 8 जून या कालावधीत हरकती व सूचना मांडता येतील.त्यानंतर विभागीय आयुक्त यांच्याकडून अंतिम प्रभाग रचना 22 जूनला निश्चित होईल. त्यानंतर प्रभाग रचना 27 जून रोजी प्रसिद्ध होणार आहे. पाटोदा तालुक्यात एका गटाची वाढ झाली असून, आता चार जि.प. गट आणि आठ पं. स. गण असणार आहेत.


नव्या आराखड्यानुसार जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे नऊ गट तर पंचायत समितीचे १८ गण वाढले आहेत. नवीन गट करताना शेजारच्या मतदारसंघाची फोडाफोड झाली आहे, त्यामुळे अनेकांना धक्का बसण्याची शक्यता आहे.

पाटोदा तालुक्यात एका गटाची वाढ झाली असून, गट, गण पुढील प्रमाणे आहेत.

जिल्हा परिषद गट डोंगरकिंन्ही ३४

पंचायत समिती गण

डोंगरकिन्ही ३७,

पिठ्ठी गण ३८



 

जिल्हा परिषद गट तांबाराजुरी ३५

पंचायत समिती गण

थेरला गण ६९

तांबाराजुरी गण ७०



 

जिल्हा परिषद गट अमळनेर गट ३६

पंचायत समिती गण

अमळनेर गण ७१

कुसळंब गण ७२


जिल्हा परिषद गट सौताडा ३७

पंचायत समिती गण

सौताडा गण ७३

पारगाव घुमरा ७५

प्रारूप गट, गण रचना झाल्याने निवडणूक लढवू इच्छित कार्यकर्ते पुन्हा एकदा तयारी सुरू करतील.

टिप्पण्या