बीड | प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न पाटोदा तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या तालुका अध्यक्ष पदी सचिन पवार यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा.एस.एम.देशमुख यांच्या आदेशानुसार मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव विशाल सोळंके तसेच सोशल व इलेक्ट्रॉनिक मिडिया आघाडीचे राज्य प्रमुख अनिल वाघमारे यांनी गत महिन्यात पाटोदा तालुक्यातील पत्रकारांची सदस्य नोंदणी केली होती.या सदस्य नोंदणी नंतर अध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया राबविण्यात आली. पाटोदा शहर व तालुक्यातील सर्व पत्रकारांनी तालुका अध्यक्ष पदासाठी सचिन पवार यांच्या नावाने ठराव संमत केला.त्या अनुषंगाने अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा.एस.एम.देशमुख यांच्या आदेशानुसार मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव विशाल सोळंके तसेच सोशल व इलेक्ट्रॉनिक मिडिया आघाडीचे राज्य प्रमुख अनिल वाघमारे यांनी पाटोदा येथील पत्रकारांच्या बैठकीतील प्रोसेडींग ठरावा आधारे पाटोदा तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या तालुका अध्यक्षपदी सचिन पवार यांची निवड जाहीर केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा