पाटोदा तालुक्यात शंखी गोगलगाय प्रादुर्भावाने पिकांचे प्रचंड नुकसान


 


 शेतकरी अडचणीत, पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा :- दिपक ( दादा ) घुमरे

पाटोदा ( प्रतिनिधी )

पाटोदा तालुक्यात शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव दिसून येत असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यामुळे शेतकरी अडचणीत सापडल्याने पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा

 अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा जिल्हाउपाध्यक्ष दिपक ( दादा )घुमरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांवर गोगलगायीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने शेतकऱ्यांनी आता काय करायचं हा प्रश्न उपस्थित राहिला आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या भावना समजून घेऊन तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.यावर्षी कमी प्रमाणात पाऊस पडला असून तलाव सध्या तरी कोरडे ठाणच आहेत.परंतु यात गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढल्याने पीक आलेले सुद्धा पूर्णपणे वाया गेले असून काही ठिकाणी दुबार पेरणी देखील झाली आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष दिपक (दादा) घुमरे यांनी केली आहे.

 शेतकऱ्यांच्या भावना कोण समजून घेणार ?

शेतकऱ्यावर कोणतेही संकट आले तरी त्या ठिकाणी आवश्यक तेवढे लक्ष दिले जात नाही मग ओला दुष्काळ असो कोरडा दुष्काळ असो किंवा रोगराई असो कुणाला तरी आवाज उठवावच लागतो परंतु प्रशासनामध्ये काम करत असलेले कर्मचारी मग करतात तरी काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.त्यांनी स्वतःहून शेतकऱ्यांच्या भावना समजून घेऊन पंचनामे केली पाहिजेत अशीच शेतकरी वर्गातून मागणी केली आहे.

टिप्पण्या