सांगली येथील शिक्षण संस्था महामंडळाच्या अधिवेशनास उपस्थित राहावे-दिपक घुमरे


 

बीड: शिव जागृती न्यूज

शिक्षण संस्था महामंडळ राज्य अधिवेशन सांगली  येथे होत असून हे अधिवेशन संस्था महामंडळाच्या प्रदेश अध्यक्ष खा सुप्रियाताई सुळे यांच्या अध्यक्षतेखाली होत असून या अधिवेशनास शिक्षण मंत्री दिपक केसरकर , उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व इतर मंत्रीगण उपस्थित राहणार असून मराठवाडा विभागातून हजारो च्या संख्येने संस्था प्रतिनिधींनी उपस्थित रहावे असे आवाहन विभागीय सहकार्यवाह तथा बीड जिल्हा अध्यक्ष दिपक  घुमरे यांनी केले आहे.

बीड येथील शिक्षक भवन येथे शिक्षण संस्था प्रमुखाच्या बैठकीत ते बोलत होते , या बैठकीस सहकार महर्षी रामकृष्ण बांगर , संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा सर्जेराव काळे , जेष्ठ मार्गदर्शक गो गो मिसाळ , जिल्हा सरचिटणीस उत्तम पवार , काळे महादेव , सुभाष पवळ ,जितेंद्र डोंगरे , घुले गोपीनाथराव कागदे आश्रुबा दिलीप ख्रिस्ती , प्रकाश पाटील , मोहनराव शिरसाट , शेख मुसा , गोविंदराव सरवदे , खांडेकर मंगल , भांगे निवृत्ती आदी संस्था प्रमुख हजर होते.

 सदरील बैठकीत सन 2022 ची संच मान्यता 2019 प्रमाणे करावी , टप्प्या वरील तुकड्या व शाळांना प्रचलित नियमाप्रमाणे. वेतन अनुदान व वेतनेत्तर अनुदान द्यावे , प्रत्येक तालुक्यातील तालुका कार्यकारिणी जाहीर करावी , विषय वीज कोर्टात प्रकरणे संघटने मार्फत टाकावीत , शासन वेततनेत्तर अनुदान देत नसेल तर इमारती देऊ नयेत , सेवक पदे शासनाने रद्द केली आहेत ती परत केअर टेकर च्या स्वरूपात द्यावीत आदी मागण्यांवर विचार करून ठराव पारित करण्यात आले व 2 ऑक्टोबर च्या सांगली  येथील अधिवेशनास बहुसंख्येने सर्व संस्था प्रमुखांनी हजर रहावे असे ठरले

टिप्पण्या